किचनमध्ये झुरळांचा सुळसुळाट झालाय? करा 'हे' उपाय

किचनमध्ये झुरळांचा सुळसुळाट झालाय? करा 'हे' उपाय

किचन जितके नीटनेटके असेल तितके ते अधिक चांगले दिसते.
Published by  :
Siddhi Naringrekar

किचन जितके नीटनेटके असेल तितके ते अधिक चांगले दिसते.किचनमध्ये झुरळांचा सुळसुळाट होणे ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र या झुरळांपासून सुटका कशी करुन घ्यायची यासाठी प्रत्येकजण काहीनाकाही उपाय शोधत असते.

सिंकखाली सतत पाणी पडत असते. हे पाणी तसेच राहिले तर त्या ठिकाणी कोंदटपणा तयार होतो. त्यामुळे झुरळ तयार होतात. सिंक खाली जागा जितकी मोकळी असेल तितकी जास्त चांगली.

घरातील झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी पांढरा व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा आणि त्याठिकाणी मारा. व्हिनेगरच्या वासाने झुरळे पळून जातील.

ज्याठिकाणी झुरळं येतात त्याठिकाणी तुम्ही रॉकेलमध्ये बुडवलेले कापसाचे बोळे ठेवू शकता. 

स्वयंपाकघरातील सिंकजवळ बोरिक पावडरची फवारणी करु शकता. त्यामुळे झुरळे त्याठिकाणी येणार नाहीत.

स्वयंपाकघरातील सिंकभोवती बेकिंग सोडा शिंपडा. बेकिंग सोड्यामुळे झुरळे येणार नाहीत.

तमालपत्राचासुद्धा वापर तुम्ही करु शकता. तमालपत्राचा चुरा बनवा. मग घराच्या अशा कोपऱ्यावर हा चुरा ठेवा जिथे झुरळं जास्त येतात. 

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com