Amla Benefits
Amla Benefits Team Lokshahi

रिकामी पोटी करा आवळ्याचे सेवन होतील 'हे' फायदे

तुम्हाला माहित आहे का आवळा आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. तसेच आयुर्वेदामध्ये आवळा खूप महत्त्वाचा मानला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह आणि कॅल्शियम घटक आढळतात.
Published by :
shamal ghanekar

तुम्हाला माहित आहे का आवळा आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. तसेच आयुर्वेदामध्ये आवळा खूप महत्त्वाचा मानला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह आणि कॅल्शियम घटक आढळतात. आवळा रोज रिकाम्या पोटी खल्ल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने आपल्या आरोग्याला खूप फायदे होतात. तुम्हाला माहित आहे का? आवळ्याचे सेवन पुरुषांसाठी खूप गुणकारी असते. तर आम्ही तुम्हाला या लेखातून आवळा खाण्याचे किती फायदेशीर आहे ते सांगणार आहोत. तर मग चला जाणून घेऊया.

  • आवळामध्ये पॉलीफेनॉल आणि व्हिटॅमिन सीचे गुणधर्म असतात जे चांगली पचनक्रिया आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत करते . तसेच शरीराला विषाणू आणि बॅक्टेरियापासून बचाव करण्यासाठी मदत करत असतो.

  • आवळाचे सेवन केल्याने रक्ताचे प्रमाण आणि शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. निरोगी हृदयासाठी आवळा खूप फायदेशीर असतो.

Amla Benefits
रिकामी पोटी आवळा खाल्लाणे होतात हे फायदे
  • कच्चा आवळाचे सेवन केल्याने मधुमेहाची लक्षणे कमी होण्यासाठी खूप मदत होते. आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

  • आवळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने बद्धकोष्ठता, अतिसार इत्यादी पाचक आजारांपासून आराम मिळविण्यासाठी खूप उपयुक्त ठरते.

  • आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अ‍ॅसिड आणि आवश्यक अ‍ॅफॅटी सिड असतात. तसेच आवळाचे तेल केसांसाठी चांगले आणि केस मजबूत ठेवण्यासाठी मदत करते. आवळा केसांच्या वाढीस खूप मदत करते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com