Yoga
YogaTeam Lokshahi

योगाचे 'हे' पाच आसन केल्याने होतात अनेक फायदे

योगा आणि योगाचे वेगवेगळे आसन यांच्या बद्दल संपुर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वाचा..
Published by :
Team Lokshahi

योग सर्व वयोगटातील लोकांसाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य देते आणि, जर तुम्ही एखाद्या आजारातून जात असाल, शस्त्रक्रियेतून बरे होत असाल किंवा दीर्घकालीन स्थितीत जगत असाल, तर योग तुमच्या उपचाराचा अविभाज्य भाग बनू शकतो आणि आजारांपसून संरक्षण करतो.

Sukhaasan
SukhaasanTeam Lokshahi

सुखासन किंवा सुलभ मुद्रा : नवशिक्यांसाठी हे योग्य आसन आहे. सुखासनाने छाती आणि पाठीचा कणा ताणताना शरीराची स्थिती सुधारते. हे चिंता, तणाव आणि मानसिक थकवा कमी करण्यास मदत करते.

Naukaasan
NaukaasanTeam Lokshahi

नौकासन ; नौकासन तुमच्या शरीरातील पोटाच्या स्नायूंना ताणते आणि त्यांची कार्यक्षमता सुधारते. त्यामुळे पोटाची चरबीही कमी होते आणि पचनक्रिया सुधारते.

Dhanuraasan
DhanuraasanTeam lokshahi

धनुरासन : धनुरासन तुमचे संपूर्ण शरीर ताणते आणि तुमची पाठ लवचिक बनवते. वजन कमी करण्यास आणि पचनास मदत करताना, ते रक्ताभिसरण देखील वाढवते.

Halaasan
HalaasanTeam Lokshahi

हलासना : हलासनामुळे पाठीच्या स्नायूं ताणले जाते आणि पाठीचा कणा उघडतो, हे तुमचे हात, पाठीचा कणा आणि खांद्यावरचा ताण सोडवण्याचे काम करते. अनेक फायदे असल्याने, हलासन लठ्ठपणाशी लढण्यासाठी, अपचन आणि बद्धकोष्ठता म्हणजेच कॅांस्टीपेशन दूर करण्यासाठी उत्तम आहे. ते तेजस्वी त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

Sarvangasan
SarvangasanTeam Lokshahi

सर्वांगासन : सर्वांगासन म्हणजे ‘सर्व भागांचे’ आसन.सर्वांगासनामुळे निद्रानाश, नैराश्य आणि मानसिक चिंताही कमी होते. ते तेजस्वी त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com