तुम्हीही सकाळी कॉफी पिता? तर ही बातमी वाचाच अन्यथा होईल मोठे नुकसान

तुम्हीही सकाळी कॉफी पिता? तर ही बातमी वाचाच अन्यथा होईल मोठे नुकसान

असे केल्यास तुम्ही तुमच्या आरोग्याशी खेळत आहात. सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिणे तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.

अनेक लोकांना सकाळी उठल्यावरही थकवा जाणवतो आणि सुस्ती येते. यातून सुटका करण्यासाठी बरेच लोक सकाळी कॉफीचे सेवन करतात. तर, काहींची सकाळ कॉफीशिवाय सुरु होत नाही. तुम्हीही यात आहात. तर, असे केल्यास तुम्ही तुमच्या आरोग्याशी खेळत आहात. सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिणे तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.

तुम्हीही सकाळी कॉफी पिता? तर ही बातमी वाचाच अन्यथा होईल मोठे नुकसान
Winter Diet : सर्दी आणि व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा!

सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिऊ नये, अशी अनेक कारणे आहेत. विशेषतः महिलांनी रिकाम्या पोटी कॉफी पिणे टाळावे. याचे पहिले कारण म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन केल्याने शरीरातील कोर्टिसोल हार्मोन (स्ट्रेस हार्मोन) ची पातळी वाढते. यामुळे ओव्हुलेशन, वजन आणि हार्मोन्सवर वाईट परिणाम होतात.

स्ट्रेस हार्मोन्सची पातळी सकाळी जास्त आणि संध्याकाळी कमी असते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही सकाळी सर्वात आधी कॉफीचे सेवन करता तेव्हा कोर्टिसोलची पातळी कमी होण्याऐवजी ती वाढते.

कोर्टिसोल हार्मोन आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानला जातो. परंतु, जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा कोर्टिसोल हार्मोनचे उत्पादन वाढू लागते. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. कोर्टिसोलच्या उच्च पातळीमुळे वजन वाढणे आणि झोपेच्या समस्या देखील होऊ शकतात.

तुम्हीही सकाळी कॉफी पिता? तर ही बातमी वाचाच अन्यथा होईल मोठे नुकसान
वेलची खाण्याचे 'हे' आहेत गुणकारी फायदे

काय प्यावे सकाळी?

सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी पाणी पिणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. दिवसा तुम्ही जागे असता तेव्हा पाण्याचे सेवन करता, परंतु रात्री झोपल्यानंतर झोपेत तहान न लागल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासते, अशा स्थितीत पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे. सकाळी सर्वात आधी २ ते ३ ग्लास पाणी घेणे महत्वाचे आहे. पाणी प्यायल्यानंतर तुम्ही कॉफी किंवा चहा काहीही घेऊ शकता. जर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर साधे पाणी पिण्याची सवय नसेल तर तुम्ही त्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून ते पिऊ शकता. सकाळी लिंबू पाण्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

तुम्हीही सकाळी कॉफी पिता? तर ही बातमी वाचाच अन्यथा होईल मोठे नुकसान
Weight Loss Tips: ब्रेकफास्टमध्ये या पदार्थांचा समावेश करा, काही दिवसात मलायका अरोरासारखी होईल फिगर
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com