तुम्हीही चहा बनवल्यानंतर चहा पावडर फेकून देता का? आतापासून असे करू नका, करा असा वापर

तुम्हीही चहा बनवल्यानंतर चहा पावडर फेकून देता का? आतापासून असे करू नका, करा असा वापर

चहा बनवल्यानंतर लोक चहा पावडर कचरा समजून फेकून देतात. कारण ते पुन्हा वापरता येईल का माहीत नाही.
Published by :
Siddhi Naringrekar

चहा बनवल्यानंतर लोक चहा पावडर कचरा समजून फेकून देतात. कारण ते पुन्हा वापरता येईल का माहीत नाही. चहा पावडर इतर कोणत्या मार्गाने वापरता येऊ शकतात जेणेकरून ती फेकून देण्याऐवजी तुम्ही त्यांचा पुन्हा वापर करू शकता, चला तर मग जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल.

चहा पावडर फेकून देण्याऐवजी तुम्ही त्यांचा खत म्हणूनही वापर करू शकता. उरलेली चहा पावडर रोज एका ठिकाणी गोळा करून उन्हात वाळवावीत, मग ती झाडांच्या मातीत मिसळावी.

काचेवरचे डाग आणि तेलाचे भांडे चहा पावडरने साफ केल्यास ते चमकतात. भांडी साफ करताना काही चहा पावडर डिश वॉशरमध्ये मिसळा, मग पाहा भांड्यांमधून काळेपणा कसा नाहीसा होतो.

एवढेच नाही तर गॅस बर्नरला चहा पावडरने साफ केल्यास ते देखील चमकेल. तुम्हाला फक्त उरलेली चहा पावडर एका भांड्यात उकळायची आहेत. नंतर त्यात डिशवॉश पावडर मिसळा आणि चिकट बॉक्स स्वच्छ करा. आता तुम्ही त्यात सामान टाकू शकता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com