तुम्हालाही पाटीवरची पेन्सिल खायची इच्छा होते? मग हे वाचाच

तुम्हालाही पाटीवरची पेन्सिल खायची इच्छा होते? मग हे वाचाच

अनेकांना पाटीवरची पेन्सिल खायची सवय असते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अनेकांना पाटीवरची पेन्सिल खायची सवय असते. लहाण मुलांपासून ते मोठ्या लोकांनाही ही सवय असते. मात्र या सवयीमुळे आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतात. जेव्हा शरीराला पोषण मिळत नाही तेव्हा आपण कमकुवत होऊ शकतो. पाटीवरची पेन्सिल खाल्लाने भूक कमी लागते. शरीरातील पोषक तत्वे कमी होऊ लागतात.

जेवणही पचत नाही आणि त्रास वाढतो. पाटीवरची पेन्सिल खाल्याने मुतखडा होतो. मुतखडा झाल्यामुळे वेदना होतात. स्लेट पेन्सिलमध्ये धोकादायक जीवाणू आढळतात, जे शरीरात गेल्यावर त्रास होऊ लागतो.

स्लेट पेन्सिलमध्ये शिशाच्या उच्च पातळीमुळे शरीराला गंभीर नुकसान होऊ शकते. स्लेट पेन्सिलचे सेवन केल्याने दातांच्या समस्या, पचनाच्या समस्या होऊ शकतात.

येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com