Coffee: ऑफिसमधील कॉफी प्यायला आवडते? मग हे वाचाच
ऑफिसमध्ये काम करताना कंटाळा येणं किंवा थकवा येणं हे स्वाभाविक आहे. तसेच काही जण तर ऑफिसमध्ये गेल्यानंतर मशीनची कॉफी पितात. पण ही कॉफी तुमच्या शरीरासाठी खूप घातक ठरू शकतात. हे सगळं अभ्यासातून समोर आले आहे. समोर आलेल्या रिसर्चमध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. मशीनची कॉफी ही शरीरासाठी विशेषतः हृदयासाठी खूप हानिकारक मानली जाते. त्यामुळे आता ऑफिसच्या मशीनची कॉफी प्यायल्याने होणाऱ्या नुकसानाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.
मशीनमधील कॉफीमध्ये कोणत्या प्रक्रिया होतात?
मशीनच्या कॉफीबद्दल रिसर्च केला केला. यामध्ये वेगवेगळ्या ऑफिसच्या कॉफी मशीनचे नमुने घेतले गेले. कॉफी मशीनमध्ये अनेक प्रक्रिया होत असतात. काहीमध्ये मेटल फिल्टर असते, काही मशीनमध्ये लिक्विड कॉफी कॉन्सन्ट्रेट तर काही मशीनमध्ये फ्रीज ड्रायड कॉफी मिसळली जाते.
अभ्यासातून काय समोर आले?
कॉफी मशीनमधून मिळणाऱ्या कॉफीमध्ये असे काही घटक आढळतात जे शरीरात 'वाईट' कोलेस्ट्रॉल वाढवू शकतात. ही घटक म्हणजे कॅफेस्टोल आणि काहवेओल आहेत.या घटकांचा थेट हृदयावर परिणाम होतो असेही अभ्यासांतून समोर आले आहे.
यावर पर्याय काय ?
ऑफिसमध्ये चांगल्या फिल्टर कॉफी मशीन आणल्या पाहिजेत किंवा कर्मचाऱ्यांना घरून स्वतःची फिल्टर केलेली कॉफी आणण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. कॉफी सोडणे आवश्यक नाही परंतु ती घेण्याची पद्धत सुधारणे गरजेचे आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते योग्य प्रमाणात कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे टाइप २ मधुमेह, अल्झायमर आणि यकृताशी संबंधित आजारांचा धोका कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुम्ही घरी बनवलेली कॉफी पिऊ शकता किंवा दुकानात बनवलेली कॉफी खरेदी करू शकता. मशीन कॉफीपासून दूर राहून तुम्ही निरोगी जीवन जगू शकता.