रात्री झोपताना केस मोकळे सोडून झोपता? मग ही सवय आताच सोडा, केस गळतीची समस्या होऊ शकते निर्माण

रात्री झोपताना केस मोकळे सोडून झोपता? मग ही सवय आताच सोडा, केस गळतीची समस्या होऊ शकते निर्माण

अनेकांना असा प्रश्न पडतो रात्री झोपतीना केस मोकळे सोडून झोपाव की, केस बांधून झोपाव. काही जण केस बांधून झोपतात त्यामगच कारणं अस की, झोपताना केस मोकळे सोडल्यास केस चेहऱ्यावर येतात आणि त्यामुळे झोप लागण्यास अडचण निर्माण होते.
Published by :
Team Lokshahi
Published on

अनेकांना असा प्रश्न पडतो रात्री झोपतीना केस मोकळे सोडून झोपाव की, केस बांधून झोपाव. काही जण केस बांधून झोपतात त्यामगच कारणं अस की, झोपताना केस मोकळे सोडल्यास केस चेहऱ्यावर येतात आणि त्यामुळे झोप लागण्यास अडचण निर्माण होते. तर काही जण केस मोकळे सोडून झोपतात कारण, केस बांधून झोपल्यास केसं खेचली जातात आणि त्यामुळे डोक दुखणे ही समस्या निर्माण होते.

पण खरं तर रात्री झोपताना केस हे बांधून झोपले पाहिजे. जास्त खेचून केस न बांधता केसांची एक हलकी वेणी घालून झोपावे. केस मोकळे ठेवून झोपल्यास सकाळी उठल्यावर आपले केस हे गळून उशीवर पडलेले असतात. तर केसांची हलकी वेणी बांधून झोपल्यास केस गळतीचे प्रमाण देखील कमी होतात.

केस बांधून झोपल्याचे परिणाम:

आपण जेव्हा केस मोकळे सोडून झोपतो तेव्हा केस कोरडे होतात आणि केस गळू लागतात ज्यामुळे केस पातळ होतात. जर तुम्हाला कुरळे केस आवडत असतील तर रात्री केस बांधून झोपल्यामुळे सकाळी कुरळे केस होतील. तसेच केस बांधताना केसांमधून फणी पिरवावी यामुळे केसांमधील गुंता कमी होतो आणि सकाळी उठल्यावर केस तुटण्याचे प्रमाण कमी होतात. केस बोधण्याआधी केसांना तेलाने मसाज करा यामुळे टाळूमध्ये रक्तीभिसरण वाढते आणि त्यामुळे केसांना पोषक द्रव्य मिळतात. केसांमध्ये मसाज केल्यामुळे ताण कमी होतो आणि डोकेदुखी, अस्वस्थता या समस्यांपासून सुटका मिळते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com