Coconut Water : गरोदरपणात नारळपाणी प्यायल्याने खरच मूल गोरं होतं का ?

Coconut Water : गरोदरपणात नारळपाणी प्यायल्याने खरच मूल गोरं होतं का ?

पण खरंच नारळाच्या पाण्याने बाळाचा रंग उजळतो का?
Published by :
Shamal Sawant
Published on

गरोदरपणात काय खावे आणि काय नाही? याबद्दल नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. त्याचप्रमाणे होणारे बाळ गुटगुटीत आणि सुदृढ जन्माला यावं असं प्रत्येक आईला वाटतं. त्याचप्रमाणे मूल हे गोरं आणि देखणं असावं असंदेखील वाटतं. त्यासाठी महिला अनेक पदार्थ तसेच पेयाचं सेवन करतात. मात्र मुलाचा रंग हा कोणत्याही पदार्थ किंवा पेयावर अवलंबून नसून शरीरातील मेलानिनच्या प्रमाणावर अवलंबून असते.

शरीराचा रंग कोणत्या घटकांवर अवलंबून असतो ?

ज्यांच्या त्वचेमध्ये मेलानिनचं प्रमाण अधिक असते त्यांचा रंग सावळा किंवा काळा असू शकतो. त्याचप्रमाणे मेलानिनचे प्रमाण कमी असलेल्या त्वचेचा रंग गोरा असलेला बघायला मिळतो. पण जन्माला येणाऱ्या मुलाचा रंग गोरा असावा यासाठी गरोदरपणात अनेक महिला वेगवेगळ्या पदार्थांचे आणि पेयाचे सेवन करतात. त्यातील एक पेय म्हणजे नारळाचे पाणी. पण खरंच नारळाच्या पाण्याने बाळाचा रंग उजळतो का? त्यामागील नक्की सत्य काय? याबद्दल आपण आता जाणून घेऊया.

काय आहे सत्य ?

गरोदरपणात अनेक महिला खाण्या-पिण्याच्या सवयी अत्यंत गंभीर घेतात. तसेच अनेक महिला तर डोळे बंद करून विश्वास देखील ठेवतात. अशाच प्रकारे नारळाचे पाणी प्यायल्याने मूल गोरं जन्माला येतं यामुळे त्या मोठ्या प्रमाणात नारळाच्या पाण्याचे सेवन करतात. पण यामध्ये नक्की तथ्य काय? याबद्दल आता सविस्तरपणे जाणून घेऊया.

काय आहे सत्य ?

तज्ञांच्या मते, मुलांच्या त्वचेचा रंग फक्त पालकांच्या जनुकांवर अवलंबून असतो. गरोदरपणात काहीही खाल्ल्याने तुमच्या बाळाच्या त्वचेच्या रंगावर कोणताही परिणाम होत नाही. बाळाच्या त्वचेत असलेल्या मेलेनिनचे प्रमाण बाळाचा रंग गोरा असेल की सावळा, काळा असेल हे ठरवते. म्हणून, गर्भधारणेदरम्यान नारळ खाणे किंवा नारळ पाणी पिणे याचा काहीही संबंध नाही.

डॉक्टरांच्या मते, नारळ पाण्यात कॅल्शियम आणि इलेक्ट्रोलाइट भरपूर प्रमाणात असते आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर असते. तथापि, गर्भधारणेदरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते सेवन करावे.तसेच गर्भधारणेदरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते सेवन करावे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com