ढेकणांच्या समस्येनं त्रस्त आहात ? एकदा 'हे' घरगुती उपाय करून पहाच

ढेकणांच्या समस्येनं त्रस्त आहात ? एकदा 'हे' घरगुती उपाय करून पहाच

अनेकदा ओलसरपणा, सूर्यप्रकाशाचा अभाव आणि स्वच्छतेच्या अभावामुळे ढेकूण घरात वाढतात. ही ढेकूण केवळ तुमच्या झोपेमध्ये अडथळा आणत नाहीत तर ते तुमच्या आरोग्यासाठीही धोकादायक असतात.
Published on

Tips to remove bed bugs : अनेकदा ओलसरपणा, सूर्यप्रकाशाचा अभाव आणि स्वच्छतेच्या अभावामुळे ढेकूण घरात वाढतात. ही ढेकूण केवळ तुमच्या झोपेमध्ये अडथळा आणत नाहीत तर ते तुमच्या आरोग्यासाठीही धोकादायक असतात. अशा परिस्थितीत, जर तुमच्या घरातही ढेकणांची दहशत असेल आणि तुम्ही अनेक उपाय करून थकला असाल, तर इतर काही सोपे उपाय तुम्हाला मदत करू शकतात. या सोप्या टिप्सच्या मदतीने ढेकणांचा नामोनिशाण मिटवला जाईल.

ढेकूण घालवण्यासाठी सोप्या टिप्स

- जर तुम्हाला ढेकणांपासून मुक्त व्हायचे असेल तर व्हिनेगर खूप उपयुक्त ठरू शकते. बेड किंवा सामान काही काळ उन्हात ठेवा आणि तुम्हाला हवे असल्यास बाटलीत व्हिनेगर घेऊन त्यावर स्प्रे करा. उच्च तापमान आणि व्हिनेगरच्या वासामुळे ढेकूण बाहेर येतील.

- ढेकणांपासून मुक्त होण्यासाठी बेकिंग सोडा देखील खूप उपयुक्त आहे. बेड, अंथरुण, गाद्या आणि लाकडी वस्तू यांच्यावर खाण्याचा सोडा टाकून ढेकूण निघून जातील.

- कडुलिंबाची पाने आणि कडुलिंबाचे तेल देखील ढेकणांपासून मुक्त होण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. कडुलिंबाची पाने ढेकणांच्या जागेवर ठेवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कडुलिंबाच्या तेलाची फवारणी करू शकता. यामुळे ढेकूण अस्वस्थ होतील आणि पळून जातील.

- दालचिनीच्या वापरानेही ढेकूण पळून जातात. यासाठी एका भांड्यात दालचिनी, आले, काळी मिरी आणि लवंगा बारीक करून पाण्यात उकळा. हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ढेकणांच्या जागेवर फवारा. त्या दरम्यान रुमचे तापमान जास्त ठेवा. ढेकणं थोड्याच वेळात मरतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com