Eat these 5 things to keep your body warm in winter
Eat these 5 things to keep your body warm in winterTeam Lokshahi

हिवाळ्यात 'या' 5 गोष्टी खाल तर तुमचे शरीर राहणार उबदार

स्वत:ला तंदुरुस्त करण्यासाठी हिवाळा ऋतू किंवा थंड हवामान एकदम परफ़ेक्ट आहे कारण या हंगामात मसालेदार अन्न देखील चांगल्या रितीने पचते.

सध्या सर्वत्र थंडीचे हंगाम सुरु झाले आहे. अनेक लोक आपआपल्या पद्धतीने थंडीवर उपाययोजना करत आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. स्वत:ला तंदुरुस्त करण्यासाठी हिवाळा ऋतू किंवा थंड हवामान एकदम परफ़ेक्ट आहे कारण या हंगामात मसालेदार अन्न देखील चांगल्या रितीने पचते. त्यामुळे या हंगामात काय आहार केल्याने तुम्ही तुमच्या शरीराला कसे उबदार ठेवू शकतात आणि थंडीत कसे आजारापासून दूर राहू शकतात. याबाबात माहिती देणार आहोत.

1. खजूर

खजुरामध्ये विटामिन ए आणि बी मुबलक प्रमाणात आढळतात. त्याचबरोबर हे एक उष्ण फळ आहे. हिवाळ्यामध्ये हे नियमितपणे खाल्ल्याने आपले शरीर आतून उबदार होते. हे बाहेरील थंडीपासून आपले संरक्षण करते.

खजूरांध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियमसह फायबर देखील भरपूर प्रमाणात आढळतात. हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. परंतु लक्षात ठेवा की त्यात साखर देखील आहे, म्हणून त्यापैकी जास्त प्रमाणात खाऊ नका.

2. उस

उसाचा रस वेगवेगळ्या प्रकारे उकळून तो कडक होईपर्यंत घट्ट केला जातो. ही प्रक्रिया केल्यावर जो हलका तपकिरी रंगाचा पदार्थ नंतर तयार होतो त्याला गूळ असे म्हणले जाते.

गुळ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे असे म्हणले जाते या गोष्टीमुळे बरेच लोक आजही आपल्या आहारात यापासून बनवलेल्या गोष्टींचा समावेश करतात. तुम्हाला हे माहितीये का, कि संपूर्ण जगात खाल्ल्या जाणार्‍या गुळापैकी ७०% गुळाचे उत्पादन भारतातच होते.

3. तीळ

तीळ हे पांढरे आणि काळ्या रंगाचे लहान आकाराचे धान्य आहे. त्याची प्रकृती गरम आहे म्हणून ती केवळ थंडीतच खाल्ले जाते. यामध्ये मोनो-सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिडसमवेत अँटी-बॅक्टेरियल खनिजे मोठ्या प्रमाणात असतात, जे खाल्ल्याने आपल्या शरीराला बरेच फायदे मिळतात. तीळाचा वापर सामान्यत: आशियामध्ये केला जातो. परदेशामध्ये ते ताहिनी नावाच्या पेस्टच्या रूपात परदेशात देखील वापरले जाते.

4. गाजर

गाजर ही एक भाजी आहे जी जमिनीच्या आत वाढते. त्याचे वैज्ञानिक नाव डॉकस कॅरोटा आहे. मिळालेल्या माहितीनुसार आशियातील लोकांनीच प्रथम त्याची लागवड सुरू केली. गाजर हृदय, मेंदू, शरिरातील नसा तसेच आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई, जी आणि के गाजरच्या रसामध्ये आढळतात, ज्यामुळे आपल्या शरीरात बरेच पौष्टिक पदार्थ मिळतात. लाल, गडद हिरव्या, पिवळ्या किंवा नारिंगीच्या भाजीमध्ये बीटा कॅरोटीन आढळतात, म्हणूनच गाजरही त्याचे मुख्य स्त्रोत आहेत. आपले शरीर बीटा-कॅरोटीनला व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित करते. ज्यामुळे आपल्या शरीरात भरपूर व्हिटॅमिन-ए येते. एक गाजर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात दररोज ३००% पेक्षा जास्त व्हिटॅमिन ए पुरवतो.

5. शेंगदाणा

शेंगदाणा हा एक प्रकारचा मेवा आहे ज्याचे वैज्ञानिक नाव अरॅचिस हायपोगाआ आहे. त्यात भरपूर प्रथिने आणि हेल्दी फ़ॅट्ससह बरीच विटामिन्स आणि मिनरल्स आढळतात. मिळालेल्या माहितीनुसार, १०० ग्रॅम कच्च्या शेंगदाण्यामध्ये १ लिटर दुधाइतके प्रोटीन असतात. तांत्रिकदृष्ट्या ह्याला शेंगा कुटुंबात आहे असे देखील म्हणले जाते.

याच्यापासून शेंगदाणा तेल, पीठ आणि प्रोटीन व्यतिरिक्त बर्‍याच गोष्टी बनविल्या जातात आणि त्यापासून बनवलेल्या वस्तू मिष्टान्न, केक, कन्फेक्शनरी, स्नॅक्स. साठी वापरल्या जातात आणि सॉस बनवण्यासाठीही याचा उपयोग केला जातो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com