Fast Food
Fast Food Team Lokshahi

झोपताना फास्ट फूड खाल्ले तर होऊ शकते भीषण परिणाम, वाचा पूर्ण माहिती

उशिरा खाल्ल्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

मुंबई: आपण बरेच वेळा रात्री बाहेरच खाण्याला पसंती देतो तर काहींना रात्री उशिरा अनेकांना काही ना काही खाण्याची सवय असते. मात्र उशिरा खाल्ल्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही उशिरापर्यंत काम करत असाल आणि आधी जेवू शकत नसाल तर तुमच्या आहाराकडे लक्ष द्या.

अमेरिकेने केलेल्या अभ्यासात उशीरा खाण्यामुळे उच्च रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्टेरॉल वाढवते. रात्री सतत खाल्ल्याने कोलेस्टेरॉलदेखील वाढू शकतात. तळलेले पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ, फास्ट फूड अवेळी खाल्ल्याने हृदयावर याचा परिणाम पहायला मिळतो. रात्री झोपायला तयार असतो तेव्हा रक्तदाब १० टक्क्यांनी कमी होणे अपेक्षित असते. या सवयीमुळे आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा जास्त धोका असतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com