Green Peas Benefits
Green Peas Benefits Team Lokshahi

थंडीत आरोग्यासाठी हिरवे मटार खाणे आहे लाभदायी

थंडीचे दिवस सुरु झाले असता आता बाजारात हिरवेगार वाटाणे दिसायला लागले आहेत. हिरवा वाटाण्याचे सेवन सर्वांनी केले पाहिजे. कारण ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
Published by :
shamal ghanekar

थंडीचे दिवस सुरु झाले असता आता बाजारात हिरवेगार वाटाणे दिसायला लागले आहेत. हिरवा वाटाण्याचे सेवन सर्वांनी केले पाहिजे. कारण ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पण जास्त मटार सेवनही चांगलं नाही. कारण त्यामुळे शरीरात गॅस तयार होते. तसेच हिरव्या वाटाण्याची भाजी, पराठे, पुलाव भात असे अनेक पदार्थ केले जातात. हिरव्या वाटाण्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे यांसारख्या अनेक पोषक घटकांचा समावेश आढळून येतो. हिरवे वाटाणे आपले वाढते वजन कमी करण्यासाठीही त्याचे सेवन केले जाते. तर आपण या लेखातून मटार खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

मटार खाण्याचे फायदे :

हिरव्या मटारमध्ये व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे आपल्या नेहमीच्या आहारामध्ये त्यांचा समावेश करा. कारण आपली हाडं मजबूत राहण्यासाठी मदत होते.

आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी हिरव्या मटारचे सेवन केले पाहिजे. हिरव्या मटारमध्ये लोह, झिंक अशा पोषक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे अनेक आजारांपासून आपल्या शरीराचा बचाव होण्यासाठी मदत होते.

Green Peas Benefits
प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी पपई आहे फायदेशीर

आपले वाढते वजन कमी करण्यासाठी हिरवे मटार खूप फायदेशीर असते. कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबरचा समावेश आहे. ते आपले वाढते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

आपल्याला सारखी एक समस्या जाणवत असते. ती म्हणजे केस गळती. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये हिरव्या मटारचा समावेश करा. कारण त्यामध्ये व्हिटॅमिन सी असते जे आपली केसगळतीला थांबवण्यासाठी मदत करते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com