Health Tips
Health Tips Team Lokshahi

तोंडली खाण्याचे आहेत अनेक फायदे

सर्वांनाच माहित आहे की हिरव्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामधील एक भाजी म्हणजे तोंडली.
Published by :
Team Lokshahi

सर्वांनाच माहित आहे की हिरव्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामधील एक भाजी म्हणजे तोंडली (Tondali). तोंडली ही भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र अनेकजणांना त्याच्या गुणधर्मबाबत फारशी माहिती नाही आहे. तोंडलीमध्ये व्हिटॅमिन ए, बी 1, बी 2, सी, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम यासारखे अनेक पोषक घटक आहेत. तोंडलीचा आकार जेवढा छोटा आहे तेवढीच तोंडलीची भाजी चवीला खूप चविष्ट असते. तोंडली अनेक आजारांवर फायदेशीर आहे.

Health Tips
Detox Drink Health Benefits : दररोज प्या डिटॉक्स ड्रिंक मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

तोंडलीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे ते आपली पचनप्रक्रिया सुधारते त्यामुळे तोंडली अपल्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे आपल्या आहारात तोंडलीचा समावेश करणे खूप गरजेचे आहे.

आहारामध्ये तोंडलीचा समावेश केल्याने आपल्याला त्याचा फायदाच होईल. एसिडिटीच्या समस्या असणाऱ्या व्यक्तीने आहारात तोंडलीचा समावेश करा. ज्यामुळे तुम्हाला होणारा एसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

तोंडलीचा समावेश आपल्या आहारात केल्याने आपले वाढते वजन नियंत्रणास ठेवण्यास मदत होईल.

ताप, सर्दी, घशाच्या समस्या जर तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही तोंडली खाऊ शकता कारण ते या समस्यांवर त्यावर औषधाप्रमाणे काम करते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com