'या' पाच आयुर्वेदिक सवयींचा दैनंदिनीमध्ये करा समावेश, मेकअपशिवायही चमकेल चेहरा

'या' पाच आयुर्वेदिक सवयींचा दैनंदिनीमध्ये करा समावेश, मेकअपशिवायही चमकेल चेहरा

सुंदर, निष्कलंक, चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी अनेक महिला पार्लर किंवा मेकअप करतात. पण, त्यानंतरही त्वचा तितकीशी चमकत नाही.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Skin Care Tips : सुंदर, निष्कलंक, चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी अनेक महिला पार्लर किंवा मेकअप करतात. पण, त्यानंतरही त्वचा तितकीशी चमकत नाही. पण आता मेकअपशिवायही तुम्हाला नैसर्गिक चमक मिळू शकते. 5 सोप्या आयुर्वेदिक टिप्सचा अवलंब करून तुमची त्वचा निरोगी कशी बनवू शकता हे तुम्हाला सांगणार आहोत.

ऑइल पुलिंग

अनुष्का शर्मापासून आलिया भट्टपर्यंत बॉलीवूड अभिनेत्री चमकती त्वचा मिळविण्यासाठी ऑइल पुलिंगचा वापर करतात. आयुर्वेदात अनेक शतकांपासून ऑइल पुलिंग चालत आले आहे, ज्यामध्ये एक चमचा खोबरेल तेल काही मिनिटे तोंडात टाकणे आणि नंतर थुंकणे समाविष्ट आहे. हे सकाळी रिकाम्या पोटी, ब्रश करण्यापूर्वी किंवा नंतर केले जाऊ शकते. यामुळे श्वासाची दुर्गंधी कमी होतेच, दात पांढरे होतात, पचनसंस्था निरोगी राहते आणि त्वचाही चमकदार होते.

मसाज

हजारो रुपये किमतीचा बॉडी स्पा घेण्यापेक्षा घरीच बॉडी मसाज करणे चांगले. यासाठी तिळाचे तेल वापरावे. तिळाच्या तेलाचे आयुर्वेदात अनेक फायदे आहेत, जे त्वचेला टवटवीत करण्यासोबतच हाडे मजबूत करतात. अशा स्थितीत आंघोळीच्या २० मिनिटे आधी आठवड्यातून दोन ते तीन वेळा बॉडी मसाज करणे आवश्यक आहे.

प्राणायाम

निरोगी त्वचा आणि शांत मनासाठी प्राणायाम खूप महत्वाचे आहे. यामुळे तुम्ही निरोगी तर राहालच पण तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमकही येईल.

आहार

आयुर्वेदात खाण्यापिण्याच्या सवयींबाबत विशेष काळजी घेण्याचे सांगितले आहे. यामुळे शरीराला पुरेसे पोषण मिळते आणि त्वचा आतून चमकते. यासाठी आपला आहार संतुलित ठेवा आणि केवळ सकस आहार घ्या.

नस्य संस्कार

नस्य कर्म म्हणजे तुप किंवा तिळाच्या तेलाचे दोन थेंब नाकात टाकल्याने त्वचेशी संबंधित समस्या तर कमी होतातच पण केस अकाली पांढरे होणे किंवा टक्कल पडणे देखील कमी होते. आणि तुम्हाला चांगली झोपही येते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com