कुकरच्या शिट्टीमधून पाणी वाहू लागल्यास करा 'या' टिप्स फॉलो

कुकरच्या शिट्टीमधून पाणी वाहू लागल्यास करा 'या' टिप्स फॉलो

स्वयंपाकघरात काम करताना सर्वात मोठी समस्या कुकरमध्ये शिट्टी वाजवण्याची असते. तुम्हाला येथे काही सोप्या टिप्स देण्यात येणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला कुकरच्या शिट्टीशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल.
Published on

Kitchen tips : स्वयंपाकघरात काम करताना सर्वात मोठी समस्या कुकरमध्ये शिट्टी वाजवण्याची असते. अनेकदा कुकरची शिट्टी न वाजल्याने अन्न जळते. कुकरमधून शिट्टी वाजवण्याऐवजी पाणी किंवा डाळ वाहू लागते. या सर्व समस्यांना महिलांना दररोज तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला येथे काही सोप्या टिप्स देण्यात येणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला कुकरच्या शिट्टीशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल.

कुकरच्या शिट्टीमधून पाणी वाहू लागल्यास करा 'या' टिप्स फॉलो
तांदळाच्या पाण्याने चेहऱ्यावरील डाग होतील दूर, असा करा वापर

1. कुकरची शिट्टी नीट येण्यासाठी कुकरचे झाकण व्यवस्थित साफ करणे आवश्यक आहे. त्यात अन्न अडकले तर शिट्टी नीट येत नाही.

2. जेव्हा तुम्ही कुकर स्वच्छ कराल तेव्हा ब्रशच्या मदतीने शिटी व्यवस्थित स्वच्छ करा. याने कुकरच्या व्यवस्थित शिट्ट्या वाजतील. शिट्टी झाली नाही तर काही वेळा प्रेशरमुळे कुकरचा स्फोटही होतो.

3. शिट्टी गरम पाण्यात भिजवून ब्रशच्या मदतीने नीट स्वच्छ करा. मग बघा कुकरची शिट्टी लवकर कशी वाजते. दुसरीकडे कुकरच्या झाकणावर टिश्यू पेपर ठेवा. डाळीचे पिवळे डाग झाकणावर पडणार नाहीत.

4. याशिवाय झाकणाचे रबर हे देखील कारण असू शकते. जर रबर सैल असेल तर हवा तयार होऊ शकत नाही. त्यामुळे कुकरची शिट्टी नीट वाजत नाही. म्हणून जेव्हा रबर सैल होईल तेव्हा ते बदला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com