रात्री कडधान्य भिजत घालण्यास विसरलात? 'या' ट्रिक्स वापरा अन् करा स्वयंपाक

रात्री कडधान्य भिजत घालण्यास विसरलात? 'या' ट्रिक्स वापरा अन् करा स्वयंपाक

जेवण करताना आपल्याला अनेक गोष्टी पाहायला लागतात.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

जेवण करताना आपल्याला अनेक गोष्टी पाहायला लागतात. आदल्या रात्रीपासूनच आपण दुसऱ्या दिवशीच्या जेवणाच्या तयारीला आपण लागतो. भाजीसाठी काहीजण आदल्या रात्री कडधान्य भिजत घालतो. मात्र कधीकधी घाईत कडधान्य भिजत घालण्यास विसरायला होते.

जर तुम्ही रात्री कडधान्य भिजत घालायला विसरला असाल तर काळजी करू नका कडधान्य कोमट पाण्यात भिजत घाला.

तसेच कुकरमध्ये बेकिंग सोडा आणि मीठ टाकून शिजल्यामुळे कडधान्य सहज शिजतात. मात्र जास्त शिजू नये यासाठी कडधान्य उकडताना त्यात चमचाभर तेल मिसळा.

चणाडाळ भिजत घालायला विसरला तर लगेच कोमट पाण्यात मीठ घालून ते शिजवा. यासोबतच कडधान्य कोमट पाण्यात भिजत घाला आणि त्यात इनो मिसळा थोड्यावेळ भिजत ठेवा.

तसेच कडधान्य शिजवताना ते सारखं सारखं ढवळू नका, नाहीतर ते नीट शिजणार नाही.कडधान्य नेहमी कुकरमध्ये शिजवा. ते चांगले शिजते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com