Chandrashekhar Bawankule : Free Sand Royalty : 'घरकुल बांधकामासाठी मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार' चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
(Free Sand Royalty) 'घरकुल बांधकामासाठी मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार' असे चंद्रशेखर बावनकुळेंकडून निर्देश देण्यात आले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली आणि या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थींना वाळू डेपोमधून वाळू देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच रॉयल्टी पावती द्यावी असे आदेश देण्यात आले असून आठ दिवसात रॉयल्टी घरपोच न मिळाल्यास तहसीलदार जबाबदार असून अशी तक्रार आल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
यावेळी बावनकुळे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी 30 लाख घरकुले दिली आहेत. या घरकुलांना मोफत वाळू देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारलेले आहे. मात्र, या घरकुलांना वाळू मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. सर्व घरकुल लाभार्थींना घरपोच वाळू रॉयल्टीची पावती पोहच करणे आवश्यक आहे. त्याची नोंदही ठेवण्यात यावी. अधिकाऱ्यांनी आपल्या कामात कुठेही चूक करता कामा नये. तसेत पावसाळी अधिवेशनात एकही तक्रार येता कामा नये. तक्रार आली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल. असे त्यांनी म्हटले आहे.