Ganpati Decoration Ideas : 'या; सोप्या पद्धतीने तयार करा मखर; गणपती बाप्पा दिसतील शोभून

Ganpati Decoration Ideas : 'या; सोप्या पद्धतीने तयार करा मखर; गणपती बाप्पा दिसतील शोभून

गणेशोत्सव जवळ आला आहे. गणपतीसाठी मखर काय करावे कळत नाहीये, याचं टेन्शन आ
Published by  :
shweta walge

गणेशोत्सव जवळ आला आहे. गणपतीसाठी मखर काय करावे कळत नाहीये, याचं टेन्शन आलं असेल तर या काही सोप्या टिप्स बघा. अगदी कमी वेळात आणि कमी साहित्याची मदत घेऊन गणपतीसाठी छान आरास करता येईल. बघा या काही आयडिया तुम्हाला आवडतात का?

फुलांच्या माळा

अनेक जणांकडे दिड दिवसाचा गणपती असतो. त्यामुळे ताज्या फुलांच्या माळा आणून तुम्ही डेकोरेशन करू शकता. दिवसभरातून एक- दोन वेळा फुलांवर पाणी शिंपडलं तर दिड दिवस फुलं चांगली टिकतात.

लाईटिंग

अगदीच काही करायला वेळ मिळाला नाही, तर सरळ वेगवेगळे लाईट आणि लाईटिंगच्या माळा गणपतीच्या आजूबाजूला सोडा. प्रकाशमान असलेले गणपती बाप्पा छानच दिसतात.

कुंड्यांची सजावट

शोभेच्या झाडाच्या कुंड्या घरात असतील, तर डेकोरेशनसाठी वेगळं काही करण्याची गरजच नाही. आकर्षक झाडांच्या कुंड्या उचला आणि सुबक पद्धतीने गोलाकार रचून ठेवा. किंवा दोन्ही बाजूंना २ कुंड्या ठेवा. कुंड्यांच्या मधोमध गणपती बाप्पाचं आसन ठेवा. त्या झाडांवर लाईटिंग सोडा. अवघ्या १०- १५ मिनिटांत झालं डेकोरेशन.

कागदी पुठ्ठा आणि फुलं

गणपतीच्या मागे बॅकड्रॉप लावला तरी डेकोरेशन छान दिसतं. यासाठी सरळ एक मध्यम आकाराचा पुठ्ठा घ्या. त्यावर बाजारात मिळणारे सोनेरी, चंदेरी कागद चिटकवा. या कागदावर खरी किंवा आर्टिफिशियल फुलं लावून टाका. किंवा त्यावरून मोत्यांच्या माळा सोडा. झटपट सजून जाईल गणपती बसविण्याची जागा.

ओढणी

घरात छान ओढण्या असतातच. एकमेकींशी रंगसंगती जुळणाऱ्या ओढण्या घ्या. सेलोटेप लावून त्यांची छान कमान करा किंवा वेगवेगळं डिझाईन करून त्या भिंतीला चिटकवून टाका.

चहाचे कप

घरातील चहाचे कप एकावर एक रचून केवळ 3-4 तासात आकर्षक मखर तयार केला आहे. हा मखर अत्यंत सुंदर दिसेल.

साड्या

यंदाच्या गणेशोत्सवात घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमधूनच गणरायाची आरास करू शकता. पारंपरिक साड्यांच्या मदतीनं बाप्पासाठी सजावट करता येऊ शकते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com