हे घरगुती उपाय करून मिळवा हळदीच्या चिवड डागांपासून मुक्तता.

हे घरगुती उपाय करून मिळवा हळदीच्या चिवड डागांपासून मुक्तता.

कपड्यांच्या डागांमधील सगळ्यात चिवट डाग म्हणजे हळदीचा डाग. हळदीचा डाग काढणे म्हणजे सर्वात मुश्किलीचे काम.तर काही असे उपाय पाहूया ज्याने आपन सहजरित्या हळदीच्या डागांपासून मुक्तता मिळवू शकतात.

बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या आवडत्या कपड्यांचा त्याग करावा लागतो, तेही काही शुल्लक कारणांमुळे जसेकी कपड्यांवर चुकीने डाग पडतात, आणि ते डाग इतके चिवट असतात कि,काही केल्या निघत नाहीत. त्यासाठी आपल्याला विविध उपाय करावे लागतात पण ते योग्यरीत्या करणेही तितकेच गरजेचे आहे, नाहीतर कपड्यांचे नुकसान होऊ शकते, कपड्यांचा रंग उडू शकतो. यासाठी काही घरगुती उपाय आहेत जे तुमच्या कपड्यांवरील डागांपासून मुक्तता देऊ शकतात. कपड्यांच्या डागांमधील सगळ्यात चिवट डाग म्हणजे हळदीचा डाग. हळदीचा डाग काढणे म्हणजे सर्वात मुश्किलीचे काम.तर काही असे उपाय पाहूया ज्याने आपन सहजरित्या हळदीच्या डागांपासून मुक्तता देऊ शकतात.

लिंबू:-

अचानक पडलेल्या हळदीच्या डागापासून सुटका मिळवण्यासाठी लिंबू फारच उपयुक्त ठरू शकतो, डाग लागलेल्या भागावर लिंबाचे काही थेंब टाकून धुतल्यावर डागापासून त्वरित सुटका मिळू शकते.

थंड पाणी:-

पांढऱ्या शुभ्र कपड्यांवर किंवा फिकट कपड्यांवर हळदीचा डाग पडला तर त्वरित त्यांना थंड पाण्यात भिजवून नंतर डिटर्जंटने धुवून टाका. थंड पाण्यामुळे डाग निघण्यास मदत होते.

हे घरगुती उपाय करून मिळवा हळदीच्या चिवड डागांपासून मुक्तता.
Abdul Sattar : भाजप नेत्यांची चौकशी केली तर नवीन जेलच उभारावं लागेल

टूथपेस्ट:-

टूथपेस्ट देखील कपड्यांवरील डाग काढण्यास उपयुक्त ठरु शकते बऱ्याचदा आपल्याला याची कल्पनाही नसते, कि टूथपेस्टचा आसाही वापर होऊ शकतो.डाग लागलेल्या भागावर टूथपेस्ट लावून थोड्या वेळासाठी तसेच सुकू द्यावे, त्यानंतर साध्या पाण्याने धुवून टाकावे. यामुळे डाग सहजरीत्या निघू शकतो.

व्हिनेगर:-

व्हिनेगर चा वापर आपण शक्यतो स्वयंपाकासासाठी करतो, पण डाग घालवण्याच्या प्रक्रियेत देखील व्हिनेगर फायादेशीर ठरते. व्हिनेगर आणि सोप मिक्स करून डागावर लावून अर्धा तास तासेच ठेवून द्यावे, त्यानंतर नियमित प्रकारे धुवून टाकावे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com