Hair Loss Team Lokshahi
लाईफ स्टाइल
Hair Loss: केस गळतायत? तर ‘या’गोष्टी तुमच्या केसगळती थांबवतील
शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे तसेच आयर्न, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि प्रोटीनच्या तुमचे केस गळू लागतात. या सर्व गोष्टींच्या अभावामुळे केसांच्या तक्रारींना आपल्याला सामोरे जावे लागते. या सर्व केसांच्या समस्यांपासून दूर राहायचे आहे चला तर मग जाणून घेऊया उपाय
आहार असा असावा
संतुलित आणि पौष्टिक आहार घेऊन तुम्ही तुमचे केस दाट आणि काळे करू शकता. सुंदर आणि दाट केसांसाठी पालक, रताळे, गाजर, अक्रोड, अंडी, केळी, वाटाणे, ओट्स, मोड आलेली कडधान्य यांचा समावेश करा. या पदार्थामुळे तुमचे केस खूप मजबूत बनवू शकतात
केसगळतीसाठी घरगुती उपाय
केसगळतीसाठी कोरफड ही आरोग्यासाठी, फायदेशीर आहे. यासोबतच आवळा खूप गुणकारी आहे. त्यामुळे रोज एक आवळ्याचे सेवन करावे. मेथीसुद्धा केसगळती नियंत्रित करण्यासाठीही गुणकारी आहे.