Hairwash Rule
Hairwash Rule Team Lokshahi

Hairwash Rule : तुम्हीही चुकीच्या पद्धतीने शॅम्पू तर करत नाही ना, जाणून घ्या केस धुण्याची योग्य पद्धत

शॅम्पूमध्ये अनेक रसायने असतात आणि ती हार्ड असेल तर केस खराब होण्याची भीती असते.
Published by :
shweta walge

केस स्वच्छ करण्यासाठी आणि घाण काढण्यासाठी जवळजवळ प्रत्येकजण शॅम्पू वापरतो. पण केस वेळोवेळी योग्य पध्दतीने धुतले नाही तर केसांच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. केस धुताना योग्य शॅम्पूचा वापर केला पाहीजे. कारण शॅम्पूमध्ये अनेक रसायने असतात आणि ती हार्ड असेल तर केस खराब होण्याची भीती असते. पण शाम्पूच्या क्वालिटीऐवजी तुम्ही शॅम्पू करण्याच्या पद्धतीकडे लक्ष दिले आहे का? तुम्ही चुकीच्या पद्धतीने शॅम्पू केलात की नाही हे केस गळण्याचे कारण तर नाही. तर जाणून घ्या केसांना शॅम्पू करण्याची योग्य पद्धत. त्यामुळे अनावश्यक तुटणे आणि केस गळणे थांबते.

खूप जास्त शैम्पू

काही लोक जास्त प्रमाणात शॅम्पू घेतल्यास जास्त फेस होईल अस मानतात. पण जास्त शॅम्पू लावल्याने केस मुळापासून कमकुवत होतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. केसांना एकाच वेळी जास्त शॅम्पू लावल्याने केस खराब होतात आणि त्यांची चमक कमी होते.

योग्य शैम्पू

जर तुमच्या केसांमध्ये कोंडा नसेल तर अँटी डँड्रफ शॅम्पू लावण्यात काही अर्थ नाही. त्याच प्रकारे, आपली टाळू कोरडी आहे की तेलकट आहे हे जाणून घेणे. त्याच प्रकारचे शॅम्पू वापरावे.

Anna Omelchenko

गरम पाणी

जेव्हा जेव्हा कोणत्याही सौंदर्य टिप्सचा उल्लेख केला जातो तेव्हा असे सांगितले जाते की शरीरावर आणि केसांना गरम पाणी वापरू नये. केसांना कितीही तेल लावले तरी चालेल. किंवा केस कितीही घाणेरडे असले तरी केस गरम पाण्याने धुवू नयेत. त्यामुळे केस तुटण्याची समस्या वाढते. जर तुम्हाला थंडीच्या दिवसात तुमचे केस थंड पाण्याने धुणे कठीण वाटत असेल तर तुम्ही तुमचे केस कोमट पाण्याने धुवू शकता.

शैम्पू कसा लावायचा

केस आणि टाळूला शॅम्पू लावण्यासाठी नेहमी तुमच्या बोटांच्या टोकाचा वापर करा. ज्याने हळूहळू हलक्या हातांनी शॅम्पू संपूर्ण टाळूवर पसरतो आणि घाण साफ होते. कारण बरेच लोक शॅम्पूसाठी केस खूप घासतात. यामुळे केस विनाकारण तुटतात आणि कमकुवत होतात. जर तुमचे केस लांब असतील तर तुम्ही शॅम्पू करताना ते नेहमी खाली लटकत लावावे. जेणेकरून केसांत जास्त गुन्ता होणार नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com