Health
HealthTeam lokshahi

डासांमुळे आरोग्य येईल धोक्यात, मग जाणून घ्या यावर घरगुती उपाय...

पावसाळ्यामध्ये नदी किंवा नाले अशा अनेक ठिकाणापासून डासांचे प्रमाण पुन्हा एकदा वाढलेले आहेत. हे चक्र दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून ते हिवाळ्याच्या अखेर पर्यंत चालूच असते.
Published by :
Published on

पावसाळ्यामध्ये नदी किंवा नाले अशा अनेक ठिकाणापासून डासांचे प्रमाण पुन्हा एकदा वाढलेले आहेत. हे चक्र दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून ते हिवाळ्याच्या अखेर पर्यंत चालूच असते. काहीवेळा डास अचानक वाढतात व नंतर हवामानातील बदलामुळे ते अचानक गायब होतात. डास चावल्याने त्रास होतोच पण सर्वात त्रासदायक म्हणजे डास चावल्यानंतर होणारी जळजळ. या जळजळीमुळे डास चावल्यानंतर 3 ते 15 मिनिटे तुम्हाला जळजळ जाणवू शकते. अशा परिस्थितीत मन पूर्णपणे अस्वस्थ होते आणि सर्व लक्ष डास चावण्याच्या ठिकाणी खाज आणि जळजळ यावर केंद्रित होतं. अशा स्थितीत कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. आम्ही तुम्हाला घरात ठेवलेल्या त्या वस्तूंबद्दल सांगतोय ज्याचा वापर करून तुम्ही डास चावल्यानंतर लगेच होणारी जळजळ आणि खाज मिटवू शकता.

1. डास चावलेल्या ठिकाणी बर्फ लावणे हा सर्वात चांगला उपाय आहे.

2. मधाचा एक थेंब घेऊन त्या जागेवर हलक्या हाताने चोळा जळजळ आणि खाज कमी होईल.

3. एलोवेरा जेल बहुतेक लोक वापरतात आणि हे जेल घरांमध्ये असणं सामान्य आहे. हे जेल तुम्ही डास चावण्याच्या ठिकाणीही लावू शकता.

4. जर तुम्हाला चहा पिताना डास चावला असेल तर डास चावल्याची जळजळ शांत करण्यासाठी तुम्ही टी-बॅग देखील वापरू शकता.

5. घरात ठेवलेले लिंबू देखील डास चावल्यावर होणारी जळजळ लगेच शांत करण्याचे काम करते.

6. तुम्ही कुठेतरी मुलाखतीसाठी किंवा व्यावसायिक बैठकीसाठी जात असाल आणि तुम्हाला चेहऱ्यावर, मानेला, गाडीच्या आत किंवा प्रवासात डास चावला असेल तर या ठिकाणी खाजवू नका. त्यापेक्षा रस्त्याच्या कडेला नारळ पाणी विकत घेऊन लावा. असं केल्याने चिडचिडही शांत होईल आणि जास्त काळ लाल डाग दिसणार नाहीत.

7. टूथपेस्टमध्येही असे अनेक घटक असतात जे या जळजळीला लगेच शांत करण्याचं काम करतात. जसं की पुदीना, बेकिंग सोडा किंवा इतर गोष्टींचा अर्क. त्यामुळे डास चावल्यावर तुम्ही टूथपेस्टही लावू शकता.

8. घरी ठेवलेला बेकिंग सोडा चिमूटभर घ्या आणि एक ते दोन थेंब पाण्यात विरघळवून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चाव्याच्या ठिकाणी लावा. जळजळ आणि खाज लगेच कमी होईल.

9. जर तुम्ही ट्रेकिंग किंवा टूर सारख्या ठिकाणी असाल आणि तुमच्याकडे यापैकी कोणतीही गोष्ट उपलब्ध नसेल तर तुम्ही पिण्याच्या पाण्याचा वापर करून देखील डास चावण्याचा त्रास टाळू शकता. त्या जागेवर थोडे पाणी टाकल्यावर खाज पूर्णपणे बरी होईल.

Health
केसांना चमकदार बनवण्यासाठी शॅम्पूनंतर हे होममेड हेअर रिन्स वापरा
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com