औषधांशिवाय मासिक पाळीची तारीख वाढवायचीयं? 'या' नैसर्गिक पद्धती येतील उपयोगी
सणा-कार्यक्रमांच्या दिवसांमध्ये आजही अनेक महिला आपल्या मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्यांचे सेवन करतात. ही औषधे तुमच्या मासिक पाळीची तारीख काही दिवसांपासून ते आठवड्यांपर्यंत वाढवण्यास मदत करतात. परंतु, त्याचे मोठे दुष्परिणाम देखील शरीरावर होतात. पण, जर तुम्हाला कोणत्याही कारणाने मासिक पाळीची तारीख वाढवावी लागत असेल. तर आम्ही तुम्हाला काही नैसर्गिक पद्धती सांगणार आहोत. या नैसर्गिक पद्धतींमुळे तुमच्या शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.
अॅपल सायडर व्हिनेगर : जर तुम्हाला तुमच्या मासिक पाळीची तारीख वाढवायची असेल. तर तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगर सेवन करू शकता. कोमट पाण्यात एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून मासिक पाळी तारखेच्या 10 ते 12 दिवस आधीपासून सेवन करण्यास सुरुवात करा. यामुळे पोट फुगणे आणि पोटदुखीच्या समस्येपासून मुक्ती मिळते. यामध्ये असलेले अॅसिड मासिक पाळी लांबण्यास मदत करते.
मोहरी : एक चमचा मोहरी रात्रभर पाण्यात अथवा दुधात भिजवून ठेवा आणि मासिक पाळी सुरू होण्याच्या एक आठवडा आधी सेवन करा. यामुळे तुमची मासिक पाळी येण्यास उशीर होऊ शकतो. मोहरीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. यामुळे तुमची मासिक पाळी नैसर्गिकरित्या उशीरा येऊ शकते.
लिंबाचा रस : अॅपल सायडर व्हिनेगरप्रमाणेच कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने मासिक पाळी लांबू शकते. यामुळे मासिक पाळीत येणाऱ्या सर्व समस्यांपासून सुटका मिळते. तसेच, मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यात मदत होते आणि रक्तप्रवाह देखील हलका होतो.
मुलतानी माती : मासिक पाळीची तारीख पुढे जाण्यासाठी मुलतानी माती देखील खूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी 25 ते 30 ग्रॅम मुलतानी माती कोमट पाण्यात मिसळा आणि मासिक पाळीच्या तारखेच्या एक आठवडा आधी सेवन करा. यामुळे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय तुमच्या मासिक पाळीच्या तारखेला विलंब होऊ शकतो. ही खूप जुनी आयुर्वेदिक रेसिपी आहे जी तुम्हाला खूप मदत करू शकते.
काकडी : काकडीच्या कूलिंग इफेक्टमुळे मासिक पाळी लांबण्यास मदत होते. असे म्हटले जाते की थंड पदार्थांमुळे मासिक पाळी लांबण्यास मदत होते. काकडी शरीराला शीतलता देते आणि म्हणूनच मासिक पाळीला उशिर करण्यासाठी ती फायदेशीर ठरू शकते. मासिक पाळीच्या तारखेच्या सुमारे एक आठवडा आधी याचे सेवन करा.