पावसाळ्यात बाथरूममध्ये येणाऱ्या गांडुळांपासून सुटका करायची? 'हे' सोप्पे उपाय करा
How To Stop Earthworms : पावसाळा सुरु झाला की बाथरूममध्ये गांडुळे येतात. जेव्हाही आपण हे पाहतो तेव्हा आपल्या मनात पहिली गोष्ट येते की ते प्रामुख्याने कुठून येत आहेत आणि ते कसे काढले जाऊ शकतात. गांडुळांना ओलसर आणि ओल्या वातावरणात राहायला आवडते. हेच कारण आहे की बाथरूमच्या नाल्या, टब आणि बेसिनजवळ तुम्हाला ते आढळतात. या लेखात आम्ही तुम्हाला बाथरूममधील गांडुळे काढण्याच्या सांगणार आहोत.
नियमित स्वच्छता आवश्यक
बाथरूममधील गांडुळांपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बाथरुम नियमितपणे स्वच्छ करणे. यासाठी, प्रत्येक वापरानंतर बाथरूम पूर्णपणे कोरडे करणे आवश्यक आहे. जेणेकरून बाथरूममध्ये जास्त वेळ ओलावा राहणार नाही आणि गांडुळे आणि त्यांची अंडी वाढण्याची संधी मिळणार नाही.
बेकिंग सोडा
ड्रेनेज पाईपमध्ये एक चमचा बेकिंग सोडा घाला आणि अर्धा तास राहू द्या. अर्ध्या तासानंतर पाणी वेगाने सोडा. यामुळे पाईपमधील सर्व गांडुळे आणि अंडी पूर्णपणे निघून जातील.
व्हाईट व्हिनेगर
साफसफाई केल्यानंतर तुम्ही गांडुळाची अंडी किंवा अळ्यापासून मुक्त होण्यासाठी व्हाईट व्हिनेगरसारखे घरगुती क्लीनर वापरू शकता.ड्रेनेजच्या आतील फ्लॅपही पांढऱ्या व्हिनेगरने स्वच्छ करा.
जाड मीठ/ खडा मीठ
बाथरूममध्ये व टॉयलेट मध्ये पांढरे जाड मीठ म्हणजेच खड्याचे मीठ पसरवून ठेवा. मीठातील क्षार या किड्यांना मारून टाकते.
डांबर गोळ्या
बाथरूम मध्ये व घरातील नेप्थलीन बॉल म्हणजे डांबर गोळ्या पसारवून ठेवा
कडुलिंब/ पुदिन्याची पाने
गांडूळ येतात अशा ठिकाणी पुदिन्याची किंवा कडुलिंबाची किंवा दोन्ही एकत्र अशी पाने कुस्कुरून टाका.
कापूर
शक्य झाल्यास एक दिवस आड घरात कापूर जाळा. नारळाची धुरी केल्यास त्यात कडुलिंबाचा पाला घालावा.