Banana Diet : डाएटचा हा नवीन ट्रेंड तुम्हाला माहीत आहे का?
आजकाल आरोग्याच्या बाबतीत प्रत्येक जण सजग झालेला बघायला मिळत आहे. धावपळीच्या काळात आरोग्याकडे लक्ष देणे काही वेळेस कठीण होते. मात्र तुम्ही जर योग्य आहार घेतल्यास त्याचे अनेक गुणकारी फायदे होऊ शकतात. अशावेळेस तुम्ही तुमच्या आहारात प्रोटिन, फायबर आणि कॅल्शियमचा समावेश केल्यास अधिक फायदे मिळतात. हे घटक फळांमध्येही असतात. त्यामुळे फळं खाणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
अनेकांना फळांमध्ये केळी खाणे अधिक आवडते. पण केळी खाण्याबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. पण केळी खाल्ल्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे सकळच्या नाश्त्यामध्ये केळी खायला अधिक पसंती देतात. पण यावरुनचं 'बनाना डाएट'ची संकल्पना समोर आली आहे. या आहारात, लोकांना नाश्त्यात फक्त केळी खावी लागतात आणि नंतर पाणी प्यावे लागते. लोक त्यांच्या क्षमतेनुसार नाश्त्यात 3-4 किंवा त्याहून अधिक केळी खाऊ शकतात. यानंतर, लोक सामान्यपणे दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण खाऊ शकतात, परंतु रात्री 8 नंतर काहीही खाण्यास मनाई आहे.
यामुळे खूप जड किंवा तेलकट अन्न खाणे टाळले जाते. या जपानी ब्रेकफास्टच्या आहाराचा ट्रेंड सध्या वाढताना दिसतो. आरोग्य तज्ञांच्या मते, सकाळचा केळीचा आहार आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. केळीमध्ये नैसर्गिक साखर, फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीरातील चयापचय क्रिया वाढते आणि कॅलरीज कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी प्रभावी मानले जाते.
(टीप : सदर माहिती आणि उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. लोकशाही मराठी याची पुष्टी करत नाही. उपायांचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. )