SKIN CARE
SKIN CARETeam LokshahI

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते का ? मग करा 'हे' उपाय

हिवाळ्यात त्वचेची नैसर्गिकरित्या अशी काळजी घ्या

हिवाळ्यात त्वचेवरचा तेज कमी होतो व त्वचा कोरडी पडू लागते आणि यामुळे त्वचेसंबधिच्या अनेक समस्या उदभवतात म्हणून हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणं खूप म्हत्वाच असतं. तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी घरगुती उपाय निवडा.

Almond Oil
Almond OilTeam Lokshahi

बदाम तेल : बदाम तेल हे त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरते. हे तेल त्वचेला मॉइश्चरायज करते आणि नैसर्गिक चमक राखण्यास मदत करते.

Alovera
AloveraTeam Lokshahi

कोरफड : कोरफड वापरल्याने त्वचा मॉइश्चरायझ राहते व कोरफड त्वचेवर असलेले मुरूम आणि सूरकूत्या दुर करण्यास मदत करते व त्वचा तेसस्वी राहते.

Oat Meak and Milk
Oat Meak and MilkTeam Lokshahi

ओटमिल आणि दुध : दुध आणि ओटमिल एकत्रीत करून त्याचं मिश्रण चेहऱ्यावर लावा, हलक्या हाताने चोळा आणि कोरडे होऊ द्या 5 मिनिटं ठेवून चेहरा धुवून घ्या. यामुळे त्वचा स्वच्छ होते व त्याच बरोबर ती अधिक चमकदार आणि सुंदर दिसू लागते.

Banana and Honey
Banana and Honey Team Lokshahi

केळीचा फेस पॅक : जर तुमचा चेहरा कोरडा असेल तर चेहर्‍यावर केळीचा फेस पॅक लावू शकता. केळी मॅश करून त्यात दूध, मध, लिंबाचा रस घालून चेहऱ्याला लावा.

Egg and Honey
Egg and Honey Team Lokshahi

मध आणि अंड्याचा पॅक : मध आणि अंडी असे काही उत्कृष्ट घटक आहेत जे लोक पुर्वी पासून वापरत आहेत. ते त्वचेला मॉइश्चरायझ करतात आणि अंतिम परिणाम म्हणजे त्वचा मऊ आणि तेजस्वी दिसू लागते.

Water
WaterTesm Lokshahi

भरपूर पाणी पिणे : हिवाळ्यात त्वचा आतून हायड्रेट ठेवायची असेल तर भरपूर प्रमाणात पाणी प्या. याने त्वचा हायड्रेट तर राहतेच. परंतू,  चेहर्‍यावर तेज देखील येते.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com