'डबल चिन'चा होतोय त्रास? 'या' 5 टिप्सने चेहऱ्यावरील चरबीपासून व्हा मुक्त
How to Reduce Face Fat : चेहरा हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग मानला जातो. कारण बहुतेक लोक त्यांच्या स्वभावापेक्षा एखाद्याच्या चेहऱ्यावर जास्त प्रभावित होतात. चेहरा उजळण्यासाठी लोक विविध प्रकारच्या क्रीम्स आणि कितीतरी प्रकारची सौंदर्यप्रसाधने वापरतात. तथापि, एक गोष्ट अशी आहे, जी ना क्रीमसोबत जाते ना कॉस्मेटिकसोबत. ती म्हणजे चेहऱ्यावर जमा झालेल्या चरबी. चेहऱ्यावरील चरबी कमी करणे देखील महत्त्वाचे आहे कारण ते आपल्याला अधिक आकर्षक बनवते. योग्य टिप्सच्या मदतीने चेहऱ्यावर जमा झालेली चरबी दूर होऊ शकते.
चेहऱ्याचा मसाज : जर तुम्हाला चेहऱ्यावरील चरबी काढून टाकायची असेल, तर तुम्हाला सकाळी उठून मसाज करावा लागेल. उभे असताना किंवा बसून 2 ते 3 मिनिटे चेहऱ्यावर मसाज करा. तुम्ही तुमच्या बोटांनी गोलाकार हालचालीत हळूवारपणे मसाज करू शकता. कपाळापासून मसाज सुरू करा आणि नंतर हळूहळू गालावरून मानेपर्यंत जा.
गोड पेये टाळा : साखरयुक्त पेय हे नेहमीच आरोग्यासाठी धोकादायक मानले गेले आहे. त्याचा परिणाम चेहऱ्यावरही दिसून येतो. हेच कारण आहे की जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील चरबी नाहीशी करायची असेल तर तुम्हाला गोड किंवा साखरयुक्त पेये पिणे कमी किंवा पूर्णपणे बंद करावे लागेल.
पुरेशी झोप घेणे : निरोगी आयुष्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला चेहऱ्यावरील चरबी संपवायची असेल तर तुम्हाला रोज ७ ते ८ तास झोपावे लागेल. चांगली झोप तुमच्या शरीरात साठलेली चरबी कमी करते. पुरेशी झोप न मिळाल्याने तुमच्या शरीरात पाण्याची साठवणूक राहते, ज्यामुळे चेहरा सुजतो. म्हणूनच झोपण्याला खूप महत्त्व आहे.
मिठाचे सेवन : ज्या लोकांना चेहऱ्याची चरबी कमी करायची आहे त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांनी मिठाचे सेवन अत्यंत काळजीपूर्वक करावे. जास्त सोडियम घेतल्यास शरीराला सूज येऊ लागते. मीठाचे सेवन कमी केल्याने शरीरातील पाण्याची पातळी अबाधित राहते. त्यामुळे चेहऱ्यावरील सूज कमी होते आणि चरबीही कमी होऊ लागते.
व्यायाम महत्त्वाचा : जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर त्याचे फायदे तुमच्या शरीरावर तर दिसतातच. पण त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमकही येते. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्यासोबतच तुम्ही मानसिकदृष्ट्याही निरोगी राहता. यामुळे चेहऱ्यावरील चमकही कायम राहते. व्यायामासोबतच भरपूर पाणी प्यावे.