पांढऱ्या कपड्यावर पडले पिवळे डाग, 'या' उपायाने एका धुण्यात होतील साफ

पांढऱ्या कपड्यावर पडले पिवळे डाग, 'या' उपायाने एका धुण्यात होतील साफ

जेवताना अनेक वेळा भाजी किंवा डाळ कपड्यांवर पडते, त्यामुळे हट्टी पिवळे डाग पडतात. आज तुम्हाला एक ट्रीक सांगणार आहोत.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Cloth wash tips : जेवताना अनेक वेळा भाजी किंवा डाळ कपड्यांवर पडते, त्यामुळे हट्टी पिवळे डाग पडतात. आणि जर हे पांढऱ्या कपड्यांसोबत घडले, तर ते डाग घालवण्यासाठी तुम्हाला मोठी मेहनत करावी लागते. किंवा ते फेकून द्यावे लागतात. पण, आज तुम्हाला एक ट्रीक सांगणार आहोत. ती तुमच्या पांढऱ्या कपड्यांवरील पिवळे डाग फक्त एका वॉशमध्ये साफ करेल. चला तर मग जाणून घेऊया.

पांढऱ्या कपड्यांवरील डाग कसे काढायचे?

अल्कोहोल

अल्कोहोल घासून तुम्ही पांढर्‍या कपड्यांवरील हट्टी डाग काढू शकता. त्यात लिंबाचा रस मिसळा आणि डाग असलेल्या भागावर लावा. यानंतर त्या कापड्यावरील डाग ब्रशने घासून घ्या. यानंतर, मिश्रण काही काळ सुकण्यासाठी ठेवा. जेणेकरून ते कपड्यांमध्ये चांगले शोषले जाऊ शकते. यानंतर, ते हाताने घासून स्वच्छ पाण्याने धुवा. फक्त एका धुण्याने डाग हलका होईल.

व्हिनेगर

जर तुम्हाला तुमच्या पांढऱ्या कपड्यांवरील डाग हटवायचे असतील तर भांड्यात एक चमचा सोडा घ्या. त्यानंतर अर्धा लिंबाचा रस पिळून त्यात मिसळा. या पेस्टमध्ये एक चमचा व्हिनेगर आणि डिश वॉश जेल मिसळा. यानंतर त्यात पाणी घाला. आता हे मिश्रण टूथब्रशने डाग लागलेल्या भागावर पसरवा. आता ब्रशच्या साहाय्याने डाग असलेली जागा हलक्या हाताने घासून घ्या. यामुळे तुमच्या पांढऱ्या टी-शर्टवरील डाग काही वेळातच हलके होऊ लागतील.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com