Hair Tips : स्ट्रेटनिंग मशीनशिवाय कुरळे केस करा सरळ; जाणून घ्या सोपी पद्धत
Hair Tips : महिलांचे केस त्यांच्या सौंदर्यात भर घालतात. महिला अनेकदा हेअरस्टाइल आउटफिटनुसार निवडतात. ज्या महिलांचे केस कुरळे असतात ते अनेकदा आपले केस सरळ करतात, तर ज्या महिलांचे केस सरळ असतात ते केस कुरळे करतात. केसांची स्टाईल बदलण्यासाठी मशीनचा वापर केला जातो, यामुळे केसांचे बरेच नुकसान होते.
अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एक अशी सोपी पद्धत सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही मशीनच्या मदतीशिवाय कुरळे केस सरळ करू शकता. या पद्धतीचा अवलंब करणे खूप सोपे आहे. याचा वापर केल्याने तुमच्या केसांना कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही. विशेष म्हणजे हा घरगुती उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही.
आपल्याला 'या' दोन गोष्टींची आवश्यकता असेल
1 कप नारळाचे दूध
2 चमचे लिंबाचा रस
असे बनवा सीरम
तुम्हाला एक कप नारळाच्या दुधात दोन चमचे लिंबाचा रस मिसळावा लागेल. हे मिश्रण साधारण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा. थंडपणामुळे हे दूध घट्ट होईल. आता ते चांगले मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरा. केस सरळ करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.
केस धुणे आवश्यक
केसांना नारळाचे दूध लावण्यापूर्वी केस धुणे फार महत्वाचे आहे. केस धुताना शॅम्पू वापरू नका. केस धुतल्यानंतर ते कोरडे करा. केस सुकविण्यासाठी ब्लो ड्रायर वापरू नका. तुम्ही फक्त टॉवेल वापरून केस सुकवू शकता.
आता नारळाचे दूध लावा
आता तुमच्या केसांवर नारळाचे दूध स्प्रे करा. हा स्प्रे केसांच्या मुळांवर आणि टाळूवर व्यवस्थित करा.
केसांचा मसाज
केसांमध्ये स्प्रे केल्यानंतर किमान पाच ते सात मिनिटे मसाज करा. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.
केस पुन्हा धुवा
सर्व प्रक्रिया झाल्यानंतर आपले केस सल्फेट मुक्त शॅम्पूने धुवा. ते जास्त घासून धुवू नका. केस धुताना कंडिशनर नक्की लावा. या पद्धतीमुळे तुमचे केस बर्याच प्रमाणात सरळ होतील.

