Hydra Facial: हायड्राफेशियल म्हणजे काय आणि ते कसे केले जाते?
हायड्राफेशियल सध्याच्या सर्वात लोकप्रिय त्वचा उपचारांपैकी एक आहे. हायड्राफेशियल हे त्वचेला आश्चर्यकारकरित्या हायड्रेट करते आणि एकसमान टोन असलेली, चमकणारी त्वचा तयार करण्यात मदत करते. हायड्राफेशियल करण्यासाठी फक्त 30 मिनिटे लागतात. हायड्राफेशियल करण्यासाठी लागणाऱ्या या अनोख्या उपकरणाचे परिणाम अगदी मायक्रोडर्माब्रेशन उपचारासारखे आहेत. या दोघांमधील फरक एवढाच आहे की ते उपचारासोबतच त्वचेला हायड्रेट देखील करते. या स्किन ट्रीटमेंटचे आश्चर्यकारक परिणाम बघून अधिकाधिक लोक हायड्राफेशियलकडे वळत आहेत. चला जाणून घेऊया हायड्राफेशियल म्हणजे काय आणि ते कसे केले जाते?
हायड्राफेशियल म्हणजे काय?
हायड्रा फेशियल ही एकमेव हायड्रा-डर्माब्रेशन प्रक्रिया आहे. जे तुम्हाला ग्लोइंग-सॉफ्ट स्किन देते. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की त्याचा परिणाम झटपट दिसून येतो, त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल आणि तुमच्याकडे स्पा वगैरे करून घ्यायला वेळ नसेल तर तुमच्यासाठी हायड्राफेशियल हा सर्वोत्तम पर्याय आहे. कारण ते अवघ्या अर्ध्या तासात त्वचा स्वच्छ करू शकते. हायड्राफेशियलला मायक्रोडर्माब्रेशनची आवश्यकता नसते. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी ते पाण्याचा वापर करते. हे फेशियल तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करते.
हायड्रा फेशियल कसे केले जाते?
हायड्राफेशियल अनेक टप्प्यात पूर्ण केले जाते. यात व्हॅक्यूम-आधारित वेदनारहित एक्स्ट्रॅक्शन, हायड्रेशन, क्लींजिंग, एक्सफोलिएशन आणि पोषक तत्वांचे मिश्रण असते, जे स्टेप बाय स्टेप त्वचेवर लावले जाते. हायड्राफेशियल केल्यावर साधारण आठवडाभर चेहऱ्यावर ओलावा टिकून राहतो. पण तज्ज्ञांच्या मते हा उपचार केवळ 25 वर्षांच्या पुढच्या महिलांनी करावा.
हायड्राफेशियलची स्टेप बाय स्टेप प्रोसेस
हायड्राफेशियलची पहिली पायरी म्हणजे एक्सफोलिएशन. ज्यामध्ये चेहऱ्याच्या त्वचेवरील डेड स्किन सेल्स मशीनद्वारे पूर्णपणे काढून टाकण्यात येते. यानंतर, चेहऱ्यावर ग्लायकोलिक आणि सॅलिसिलिक ऍसिड पील लावले जाते. याचा वापर केल्याने चेहऱ्यावरील मुरुम किंवा डाग निघून जातात. पीलिंग ही एक अशी प्रक्रिया आहे जी चेहेऱ्याच्या त्वचेसाठी सुरक्षित आहे. त्यामुळे चेहऱ्याच्या नाजूक त्वचेला हानी पोहोचत नाही. यानंतर चेहरा स्वच्छ करून व्हॅक्यूम एक्स्ट्रॅक्शनद्वारे फेशियल केले जाते. चौथ्या टप्प्यात, अँटी-ऑक्सिडंट्स आणि इतर ऍसिड्स त्वचेच्या आत सीरमच्या स्वरूपात लावले जातात. यामुळे चेहेऱ्यावर ग्लो येतो.