भाजीत जास्त मीठ पडलं, 'या’ टिप्स वापरुन करा पुन्हा नीट

भाजीत जास्त मीठ पडलं, 'या’ टिप्स वापरुन करा पुन्हा नीट

जेवण करताना कधी कधी जेवणात चुकून जास्त मीठ पडते.
Published by  :
Siddhi Naringrekar

जेवण करताना कधी कधी जेवणात चुकून जास्त मीठ पडते. मीठ कमी झाले तर जेवताना वरून घेता येते, पण जास्त झाले तर ते परत नीट करताना पंचाईत होते. आम्ही तुम्हाला आज भाजीत जास्त मीठ झाल्यास काय करावे हे सांगणार आहोत.

भाजीत मीठ जास्त झाल्यास तुम्ही उकळलेले बटाटे मिक्स करून बिघडलेली चव सुधारू शकतो.

भाजीमध्ये मीठ जास्त झाले तर त्यात थोडे भाजलेले बेसन मिक्स करा. असे केल्याने भाजीतील मीठ कमी होइल.

भाजी मध्ये एक किंवा दोन चमचे दही टाकून मिक्स करा. दह्यामुळे तुमची भाजी परत नीट होईल.

तुपाचा देखिल तुम्ही भाजीत वापर करु शकता. भाजीत मीठाचे प्रमाण जास्त झाले असेल तर त्यात थोड तूप घालावे. तसेच शेंगदाण्याचे कुट वापरुन जेवण चविष्ट करु शकता.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com