Benefits of lemon
Benefits of lemonTeam Lokshahi

रोजच्या आहारात करा लिंबाचा समावेश होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

आपल्या उत्तम आरोग्यासाठी लिंबु हे फायदेशीर ठरते. विशेष म्हणजे उन्हाळयाच्या दिवसात तर लिंबाचा खुप वापर केला जातो. तर अनेकजण सकाळी अनाशेपोटी लिंबुपाणी पितात.
Published by :
shamal ghanekar
Published on

आपल्या उत्तम आरोग्यासाठी लिंबु हे फायदेशीर ठरते. विशेष म्हणजे उन्हाळयाच्या दिवसात तर लिंबाचा खुप वापर केला जातो. तर अनेकजण सकाळी अनाशेपोटी लिंबुपाणी पितात. कारण उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला पाहिजे असलेली ऊर्जा पुरवण्याचे काम लिंबू करते. लिंबाचे अनेक फायदे आहेत तर आपण आपल्या आहारामध्ये अनेक प्रकारे लिंबाचा समावेश करतो. लिंबू चवीला आंबट असला तरी तो जेवणातील स्वाद वाढवण्यासाठी मदत करत असतो. तसेच लिंबामध्ये अनेक औषधी गूणधर्म आहेत. रोज एका लिंबाच्या सेवनामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. तर चला जाणून घेऊया लिंबाचे फायदे.

Benefits of lemon
ब्लॅक कॉफीचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे

लिंबाचे आरोग्याला होणारे फायदे

  • आपल्या चेहऱ्यासाठी लिंबूही खूप फायदेशीर असते ते तुम्हाला माहित आहे का? आपल्या चेहऱ्यावर येणारे मुरुम दूर करण्यासाठी लिंबाच्या बियांपासून तयार केलेले तेलही तुम्ही वापरू शकता जे तुमच्या चेहऱ्यावरील मुरूम दूर करण्यासाठी मदत करते.

  • तुम्हाला तुमचे वाढते वजन कमी करायचे असेल तर दररोज सकाळी एका ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये अर्धे लिंबू पिळून ते रिकाम्या पोटी प्या. त्यामुळे दिवसभर फ्रेश वाटते. सतत प्यायल्याने त्याचा तुम्हाला फायदाच होईल आणि वजन कमी होण्यासही मदत होईल.

  • लिंबू भाज्या आणि आमटीवर पिळून खाल्ल्यामुळे जेवणाची चवही वाढते. यामुळे जेवणही पचनास मदत होते.

  • जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास जाणवत असेल तर लिंबू पाणी पिणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.

  • तसेच तोंडातील दुर्गंधी दूर करायची असेल तर लिंबू पाण्याचे सेवन करा त्याची तुम्हाला मदतच होईल आणि तुम्हालाही फ्रेश वाटेल.

  • तुम्ही रोज जेवणानंतर एका ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिसळून त्याचे  सेवन करा. ज्यामुळे  खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन रक्तदाबही नियंत्रित राहतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com