Jasmin Bhasin
Jasmin Bhasin Team Lokshahi

Jasmin Bhasin Beauty Secret: जास्मिन भसीन अशी घेते आपल्या त्वचेची काळजी

जास्मिन तिच्या सौंदर्यासाठी लाखो रुपये खर्च करत असेल असे बहुतेकांना वाटते पण प्रत्यक्षात तसे नाही.
Published by  :
shweta walge

प्रसिध्द अभिनेत्री जस्मिन भासीन तिच्या स्टाईलमुळे लोकांना खूप आवडते. टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करून तीने घराघरात नाव कमावले आहे. जस्मिनने सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, लोक तिच्या फोटो आणि व्हिडिओवर खूप प्रेम करतात. जस्मिनची ग्लोइंग स्किन पाहून सगळेच तिचे वेडे होतात. जास्मिन तिच्या सौंदर्यासाठी लाखो रुपये खर्च करत असेल असे बहुतेकांना वाटते पण प्रत्यक्षात तसे नाही.

जस्मिन तिचे सौंदर्य टिकवण्यासाठी या गोष्टींची घेते काळजी

जस्मिन तिच्या सुंदर त्वचेसाठी भरपूर पाणी पिते. यासोबतच ती पूर्ण झोप घेते. तिच्या जेवणात व्हिटॅमिन सी देखील समाविष्ट असते, ज्यामुळे ती खूप सुंदर दिसते.

या गोष्टीचा करते वापर

रात्री झोपण्याआधी ती तिचा चेहरा प्रथम स्वच्छ करते. चेहरा स्वच्छ केल्यानंतर, ती टोनर लावते आणि टोनर सुकल्यानंतर ती व्हिटॅमिन सीरम वापरते.

जस्मिन घराबाहेर पडताना सनस्क्रीन वापरायला विसरत नाही. कुठेही जाण्यापूर्वी ती व्हिटॅमिन सी सीरम नक्कीच वापरते. यामुळे तीची त्वचा नेहमीच चमकते.

घरगुती उपचारांवर ठेवते विश्वास

जस्मिनने अनेकदा सांगितले आहे की, तिचा सौंदर्य उत्पादनांपेक्षा घरगुती उपचारांवर जास्त विश्वास आहे. उदाहरणार्थ, ती दररोज तिच्या त्वचेवरील टॅनिंग काढण्यासाठी बेसन आणि पाणी वापरते.

Jasmin Bhasin
Men Skin Care: उन्हाळ्यात पुरुषांच्या त्वचेची अशी घ्या काळजी

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आनंदी असल्यामुळे, जस्मिन नेहमीच आनंदी दिसते. ती लोकांना नेहमी आनंदी राहण्याचा सल्ला देते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com