Custard Apple Benefits
Custard Apple BenefitsTeam Lokshahi

सिताफळ खाण्याचे जाणून घ्या फायदे

सिताफळ (Custard Apple ) एक सिझनल फळ आहे. काही फळे त्यात हंगामात खाण्यात खूप वेगळीच आनंद असतो. सिताफळ खाण्याचे अनेक चांगले फायदे असून आरोग्यालाही खूप लाभकारी असते.
Published by :
shamal ghanekar

सिताफळ (Custard Apple ) एक सिझनल फळ आहे. काही फळे त्यात हंगामात खाण्यात खूप वेगळाच आनंद असतो. सिताफळ खाण्याचे अनेक चांगले फायदे असून आरोग्यालाही खूप लाभकारी असते. सिताफळ खाण्यासाठी जितके स्वादिष्ट आहे तितकेच ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेकांना पिकलेल्या सिताफळाचा गर खाण्यासाठी खूप आवडतो. तर अनेकांना सिताफळापासून तयार होणारी मिल्कशेक आणि बासुंदी खूप आवडते. सिताफळ हे चवीला गोड असल्याने ज्यांना मधुमेहाच्या व्यक्तीने ते अती प्रमाणात खाऊ नये. नियमित एक सिताफळ खाण्यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता. तर चला जाणून घेऊया सिताफळ खाण्याचे आपल्या आरोग्याला होणारे फायदे.

सिताफळ खाण्याचे फायदे

जर तुम्हाला तुमचे वाढते वजन कमी करायचं असेल तर सिताफळ हे उत्तम फळ आहे. सिताफळ खल्ल्यामुळे पोट भरल्यासारखे राहते ज्यामुळे सतत लागणारी भुक लागत नाही. आणि तुमचे वाढते वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होते.

सिताफळामध्ये बी कॉप्लेक्स व्हिटॅमिन असते. आपल्याला सततची होणारी चिंता, चिडचिड, थकवा, मानसिक तणाव दूर करण्यासाठी तुम्ही सिताफळाचा वापर करू शकता.

Custard Apple Benefits
निरोगी आरोग्यासाठी हिरव्या भाज्या असतात फायदेशीर

जर तुम्हाला दात आणि हिरड्यांच्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही सिताफळाची साल सुकवून ती तुमच्या दात आणि हिरड्यांसाठी वापरू शकता त्याचा तुम्हाला फायदाच होईल. त्यामुळे होणाऱ्या दात आणि हिरड्यांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

सिताफळामध्ये व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या किंवा दृष्टीबाबत जाणवत असलेल्या समस्या कमी होण्यासाठी मदत करते आणि आपली दृष्टी तेज होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com