दुधात भेसळ आहे की नाही तपासण्याची घरगुती पद्धत जाणून घ्या
भेसळ ही फक्त दूधातच होते असे नाही तर अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचा धोका कायमच असतो. दूध हे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आणि फायदेशीर आहे. दूधामध्ये कॅल्शियम, व्हिटामिन, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारखे महत्त्वाचे घटक असतात. मात्र बाजारात दूधामध्ये विविध प्रकारची भेसळ करण्यात येते. दुधातील भेसळ ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. आता दूधामध्ये भेसळ आहे की नाही हे कसं ओळखाल जाणून घ्या
सिंथेटिक दुधाची चव कडू लागते. बोटांच्या दरम्यान चोळले की ते साबणासारखे स्निग्धपणासारखे वाटते. गरम झाल्यावर ते पिवळे होते.
दुधात आयोडीनचे काही थेंब घाला.मिक्स केल्यावर मिश्रणाचा रंग निळा होईल.
10 मिलीलीटर दुधात पोटेशियम कार्बेनाइटचे 5-6 थेंब टाकावे. जर दुधाचा रंग पिवळा पडला तर समजावे की भेसळ आहे.
जर तुमच्या दुधात भेसळ असेल किंवा त्यात कोणत्याही प्रकारचे सिंथेटिक असेल. दुधाचा वास घेऊन तुम्ही याबद्दल जाणून घेऊ शकता.