Tattoo काढताय ? मग 'या' महत्त्वाच्या गोष्टी ध्यानात घ्या
आजकाल टॅटू काढण्याची क्रेझ तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. स्टायलिश लूक क्रिएट करण्यासाठी आणि ट्रेंडमध्ये राहण्यासाठी अनेकजण स्वतःच्या शरीरावर टॅटू बनवतात. मात्र टॅटू काढण्याआधी आणि काढल्यानंतर काही विशेष गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे, या गोष्टींची माहिती असेल तर तुम्ही तुमचा पहिला टॅटूचा अनुभव आनंददायी आणि सुरक्षित बनवू शकता.
वेगवेगळ्या डिझाइन्सचे टॅटू काढण्याची क्रेझ टीनएजर्स, युवक आणि महिलांमध्ये अधिक दिसून येते. जर तुम्ही पहिल्यांदाच टॅटू काढणार असाल,तर काही गोष्टी प्रकर्षाने जाणून घेणे महत्वाचे आहे. आपल्या शरीरावर टॅटू काढणे हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे प्रथम टॅटू काढण्यापूर्वी तुमच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी, वेदना कशा सहन करायच्या आणि टॅटू काढल्यानंतर काय करावे लागेल याबद्दल सर्व माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही निवडलेला टॅटू तुमच्यासाठी योग्य आहे की नाही याचा निर्णय घ्या आणि योग्य टॅटू कलाकार निवडा. तुम्हाला कश्याप्रकारे टॅटू पाहिजे याची पूर्ण आणि व्यवस्थित माहिती टॅटू आर्टिस्टला दिली तर तुमचा टॅटू चांगला दिसू शकतो.
- योग्य टॅटू कलाकार निवडा. टॅटू पार्लर स्वच्छ आणि सुरक्षित आहे कि नाही तसेच वापरलेली सुई नवीन आणि निर्जंतुक असल्याची खात्री करा.
- टॅटू कुठे आणि कसा काढायचा ते निश्चित करा
- टॅटू काढताना थोडासा त्रास होऊ शकतो, त्यामुळे वेदना सहन करण्याची मानसिक तयारी ठेवा.
- टॅटू काढल्यानंतर, त्वचेला योग्यरित्या स्वच्छ आणि कोरडे ठेवा.टॅटू काढलेला भाग थेट सूर्यप्रकाशात उघडणे टाळा.
- टॅटू काढल्यावर त्वचेच्या ऍलर्जी किंवा इतर आरोग्य समस्या जाणवल्या तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- टॅटू काढल्यावर तो पूर्णपणे भरून येईपर्यंत, तो पाण्यात भिजणार नाही याची काळजी घ्या.
- तुम्हाला कोणत्याही गोष्टीची ऍलर्जी असल्यास, टॅटू आर्टिस्टला सांगा.
- तुमच्या मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबातील सदस्यांकडून ज्यांना टॅटू आहेत, त्यांच्याशी सल्लामसलत करा.
- टॅटू काढल्यानंतर टॅटू क्रीमचा,मॉइश्चरायझरचा वापर करा.
- टॅटू आर्टिस्ट तुमच्या त्वचेवर टॅटू काढत असताना, त्याला सहकार्य करा आणि त्याच्या सूचनांचे पालन करा.
अश्याप्रकारे पहिल्यांदा टॅटू काढत असाल तर वरील महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आरामात आणि सुरेख टॅटू काढू शकता. योग्य नियोजन आणि काळजी घेतल्यास, टॅटू काढण्याची प्रक्रिया सुद्धा सोपी आणि आनंददायी होऊ शकते.