फाउंडेशन लावल्यानंतरही परफेक्ट ग्लो मिळत नाही? तर तुम्ही 'ही' चूक करत आहात

फाउंडेशन लावल्यानंतरही परफेक्ट ग्लो मिळत नाही? तर तुम्ही 'ही' चूक करत आहात

मेकअप करणे ही देखील एक कला आहे असे म्हणतात. त्यामुळे मेकअप कसा करायचा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

How To Apply Foundation : मेकअप करणे ही देखील एक कला आहे असे म्हणतात. त्यामुळे मेकअप कसा करायचा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. फाउंडेशनचा वापर चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी केला जातो. परंतु, बहुतेक लोकांना फाउंडेशन कसे लावायचे हे माहित नसते. चला जाणून घेऊया चेहऱ्यावर फाउंडेशन लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे?

फाउंडेशन लावल्यानंतरही परफेक्ट ग्लो मिळत नाही? तर तुम्ही 'ही' चूक करत आहात
वाढत्या थंडीमुळे कोंड्याची समस्या? 'या' सोप्या टिप्सने होईल दूर

चेहऱ्यावर फाउंडेशन लावण्याची योग्य पद्धत

प्राइमर

सर्वप्रथम चेहऱ्यावर मेकअप करण्यापूर्वी फाउंडेशन म्हणजेच प्राइमर लावणे किती महत्त्वाचे आहे हे समजून घेतले पाहिजे. यामुळे रंग एकसंध होतो आणि चेहऱ्याची उघडी छिद्रे भरतात. यामुळे चेहरा गुळगुळीत दिसतो आणि चेहऱ्यावर मेकअपसाठी स्मूथ बेस तयार होतो.

कन्सीलर

बरेच लोक प्रथम फाउंडेशन लावतात आणि नंतर डोळ्यांखाली आणि इतर ठिकाणी कन्सीलर वापरतात हे चुकीचे आहे. प्रथम फाउंडेशन लावावे आणि नंतर कन्सीलर लावावे. यामुळे चेहऱ्यावर डाग दिसणार नाहीत आणि रंगही एकसारखा दिसेल.

कन्सीलर सेट करा

चेहऱ्यावर कन्सीलर लावल्यानंतर ते काही काळ तसेच ठेवावे. कन्सीलर सेट व्हायला थोडा वेळ लागतो हे तुम्हाला माहित असायला हवे. याने ते चेहऱ्यावर चांगले मिसळेल.

हनुवटी आणि नाकाच्या टोकावर लक्ष केंद्रित करा

जेव्हा तुम्ही फाउंडेशन वापरता तेव्हा ते सुंदर आणि ठळक बनवण्यासाठी तुम्ही हनुवटी आणि नाकाच्या टोकावर लक्ष केंद्रित करायला विसरू नका. जर तुम्ही कन्सीलर आणि फाउंडेशन पूर्णपणे नितळ होईपर्यंत एकत्र केले तर तुम्हाला अधिक सुंदर परिणाम मिळेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com