Muharram 2022 | ashura
Muharram 2022 | ashurateam lokshahi

Muharram 2022 : मोहरम कधी आहे? आशुरा चा इतिहास आणि महत्व जाणून घ्या

ताजिया काढला जातो
Published by :
Shubham Tate
Published on

muharram 2022 : मोहरम हा इस्लामिक कॅलेंडरचा पहिला महिना आहे. इस्लाममध्ये या महिन्याला खूप महत्त्व आहे. मुस्लिम धर्मातील हा एक पवित्र महिना आहे. मोहरम हा रमजाननंतरचा दुसरा पवित्र महिना आहे. यंदाचा मोहरम ३१ जुलैपासून सुरू झाला आहे. मोहरमचा 10वा दिवस यौम-ए-आशुरा म्हणून ओळखला जातो. या दिवशी मुस्लिम समाजातील लोक हजरत इमाम हुसेन यांच्या हौतात्म्याचा शोक करतात. हा इस्लाम धर्माचा मुख्य दिवस मानला जातो. हजरत इमाम हुसेन हे इस्लामचे संस्थापक हजरत मुहम्मद यांचे धाकटे नातू होते. आशुरा कधी आहे आणि या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे, चला जाणून घेऊया. (muharram 2022 when is muharram history and importance of ashura)

Muharram 2022 | ashura
IRCTC : तिकीट बुक करताना तुम्हाला फक्त एका क्लिकवर मिळणार 10 लाखांचा लाभ

आशुरा कधी असतो

यावेळी 31 जुलैपासून मोहरमला सुरुवात झाली. त्यामुळे आशुरा 09 ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी आहे. याशिवाय पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही ९ ऑगस्टला आशुरा आहे. सौदी अरेबिया, इराक, संयुक्त अरब अमिराती आणि इतर अनेक देशांमध्ये 30 जुलैपासून मोहरम सुरू झाला. त्यामुळे 08 ऑगस्ट रोजी तेथे आशुरा साजरा केला जाणार आहे.

ऐतिहासिक महत्त्व

हजरत इमाम हुसेन हे इस्लामचे संस्थापक हजरत मुहम्मद यांचे धाकटे नातू होते. मोहरमच्या 10 व्या दिवशी किंवा आशुराच्या दिवशी शहीद झाले. हजरत इमाम हुसेन यांनी आपल्या इस्लामचे रक्षण करण्यासाठी ७२ साथीदारांसह हौतात्म्य पत्करले. यामध्ये त्यांच्या कुटुंबाचाही सहभाग होता. या बलिदानाच्या स्मरणार्थ मोहरम हा सण साजरा केला जातो. मोहरम महिन्याच्या १० तारखेला इमाम हुसेन आणि यजीदच्या सैन्यात करबलाची लढाई झाल्याचे इतिहासात सांगितले आहे. करबला हे इराकमधील शहर आहे.

Muharram 2022 | ashura
फातिमांवर येणार चित्रपट; दिसणार फाळणीच्या वेदना, कोण आहेत फातिमा जिना

ताजिया काढला जातो

आशुराच्या दिवशी इस्लाम धर्मातील शिया समुदायाचे लोक ताजिया काढतात. ताजिया काढून रान साजरे केले जातात. हजरत इमाम हुसेन यांची कबर ज्या ठिकाणी बांधली आहे, त्या ठिकाणी अशाच प्रकारचा ताजिया बनवून शोक यात्रा काढली जाते. या शोक यात्रेत लोक शोक व्यक्त करतात. शोक यात्रेत सहभागी होणारे लोक काळे कपडे परिधान करतात. शोक व्यक्त करताना लोक म्हणतात की या हुसैन, हम न हुए. म्हणजे हजरत इमाम हुसेन, आम्ही सर्व दुःखी आहोत. करबलाच्या युद्धात आम्ही तुमच्यासोबत नव्हतो, अन्यथा आम्हीही इस्लामच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली असती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com