Nails Tips: नखांची काळजी घेताना 'या' चुका टाळा!
प्रत्येकालाच आपले हात सुंदर आणि नखे लांब-मोठे असावेत असे वाटत असते. जेल आणि ऍक्रेलिक नखे छान दिसतात आणि हे तुमच्या नैसर्गिक नखांची मजबुती आणि वाढ रोखते. नियमित नेल आर्ट-ऍक्रेलिक आणि जेल वापरल्याने तुमच्या नखांच्या गुणवत्तेवर आणि वाढीवर विपरित परिणाम होतो. या जाणून घेऊया तुम्ही तुमच्या नखांची काळजी कसे घ्याल?

व्हिटॅमिन सी नखांच्या वाढीसाठी खरोखर उपयुक्त असल्याचे ओळखले जाते. एक लिंबाचा घ्या आणि तो दिवसातून एकदा तरी तुमच्या हाताच्या बोटांच्या आणि पायाच्या नखांवर घासा. पाच मिनिटे घासून नंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे तुमची नखे वाढण्यास मदत होईल आणि ते स्वच्छ आणि बॅक्टेरियामुक्त राहतील.

खोबरेल तेल हे 'व्हिटॅमिन-ई' ने भरलेले असते आणि ते अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या नखांना खोबरेल तेलाने मसाज करा नखांच्या वाढीस चालना मिळेल.

ऑलिव्ह ऑइल तुमच्या नखांच्या आतील थरापर्यंत पोहोचते आणि नखांचा कोरडेपणा बरा करेल. नखांच्या वाढीस मदत करेल.

अंड्याचे कवच घ्या, ते स्वच्छ करा आणि नंतर पेस्ट बनवण्यासाठी बारीक करा. त्यानंतर तुम्ही तुमच्या नखांवर पेस्ट लावू शकता. हा पॅक तुमच्या नखांची वाढ होण्यास मदत करेल.