Parle Company : जगातील सर्वात प्रसिद्ध बिस्कीट पार्ले-जीची स्थापना कोण केली? वाचा इतिहास सविस्तर
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
पार्ले-जी बिस्किट हे नाव घेताच प्रत्येकाच्या मनात चहा-स्नॅक्सची आठवण येते. गेल्या दशकांपासून प्रत्येक घरात हा ब्रँड पोहोचला आहे. मोनॅको, हाईड अँड सिकसारखी बिस्किटेही पार्ले कंपनीतर्फे तयार होतात. पण या यशस्वी ब्रँडमागील कंपनीचा इतिहास फारच कमी लोकांना माहीत आहे. विशेष म्हणजे या कंपनीचे मुंबईशी खास नाते आहे. पार्ले प्रोडक्ट्स ही खासगी कंपनी चौहान कुटुंबाकडून चालवली जाते आणि तिची उलाढाल कोट्यवधी रुपयांत आहे.
१९२९ मध्ये मोहनलाल चौहानांची स्थापना; स्वदेशी आंदोलनाची प्रेरणा
पार्ले प्रोडक्ट्सची स्थापना १९२९ साली मोहनलाल दयाल चौहान यांनी केली. चौहान कुटुंब गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील आहे. १९१९-२० मध्ये मोहनलाल मुंबईत रेशम व्यापारी होते. स्वदेशी आंदोलनाने प्रेरित होऊन त्यांनी ब्रिटिश खाद्यपदार्थांना भारतीय पर्याय देण्याचे ठरवले. तेव्हा बिस्किटे आयात होत असल्याने श्रीमंतांनाच मिळत. बिस्किट उत्पादनाचे तंत्र शिकण्यासाठी ते जर्मनीत गेले आणि ६० हजार रुपयांच्या मशीनसह परतले. मुंबईच्या विले पार्ले भागात १२ कुटुंबांना सोबत घेऊन त्यांनी कंपनी सुरू केली. आजही चौहान वंशज चालवतात.
विजय चौहान अध्यक्ष; कुटुंबाकडेच पूर्ण मालकी
सध्या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय चौहान आहेत. शरद चौहान आणि राज चौहान महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळतात. कंपनीत चौहान कुटुंबाबाहेरील कोणतेही शेअर्स नाहीत. पार्ले हे फक्त ब्रँड नसून विश्वास आणि गुणवत्तेचे प्रतीक आहे. या कंपनीने भारतीय बिस्किट बाजारपेठेत अग्रेसर स्थान मिळवले आहे.
पार्ले-जीची स्थापना १९२९ मध्ये मोहनलाल चौहान यांनी केली.
कंपनीची सुरुवात विले पार्ले, मुंबईत १२ कुटुंबांसह झाली.
चौहान कुटुंबाकडेच पार्ले प्रोडक्ट्सची संपूर्ण मालकी आहे.
पार्ले-जी भारतात बिस्कीट बाजारात अग्रगण्य, जागतिक स्तरावर लोकप्रिय ब्रँड आहे.
