रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या डाळिंबाचा रस, त्वचे बरोबर शरीरालाही होतील अनेक फायदे

रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या डाळिंबाचा रस, त्वचे बरोबर शरीरालाही होतील अनेक फायदे

आपल्या रोजच्या आहारामध्ये फळांचा समावेश केला की बरेचसे आजार दूर होतात.
Published by  :
shweta walge

आपल्या रोजच्या आहारामध्ये फळांचा समावेश केला की बरेचसे आजार दूर होतात. आणि शरीर निरोगी राहू लागते. फळांबरोबरच फळांचा रसही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. डाळिंबाचा रस तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

दररोज सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस पिल्याने अनेक आजार दूर होऊन शरीर निरोगी राहते. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस पिल्याने दिवसभर शरीरात ऊर्जा राहते. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होऊन हिमोग्लोबिन मध्ये देखील वाढ होते.

चेहऱ्यावरील चमक वाढेल

सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्यावर तुमच्या चेहऱ्यावरची चमक वाढू शकते. डाळिंबामध्ये अँटी-एक्सीडेंट घटक उपलब्ध असतात ज्यामुळे त्वचा चमकू आणि निरोगी राहू शकते.

गरोदर महिलांसाठी आहे विशेष फायदेशीर

महिला गरोदर असताना त्यांच्या शरीरात विटामिन आणि आयरनची कमतरता भासायला लागते. या परिस्थितीत गरोदर महिलांनी सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस नक्की प्यावा.

हृदयरोगांपासून दूर ठेवू शकतो

सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस पिल्याने हृदय निरोगी राहू शकते. डाळिंबामध्ये असे काही गुणधर्म आहेत ज्यामुळे कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात राहू शकते. त्यामुळे रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

ॲनिमिया (Anemia) दूर होऊ शकतो.

तुमच्या शरीरात जर आयरनची कमतरता भासू लागली असेल तर तुम्ही ॲनिमिया रोगाचे शिकार होऊ शकतात. डाळिंबामध्ये मुबलक प्रमाणात आयरन उपलब्ध असते. त्यामुळे जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस पिला तर तुम्ही ॲनिमिया पासून दूर राहू शकतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते

डाळिंबाच्या रसामध्ये विटामिन सी, विटामिन ए आणि आयरन भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. रोगप्रतिकारशक्ती मजबूत झाल्यावर शरीर आजारापासून दूर राहते.

बीपी कंट्रोलमध्ये राहू शकतो

डाळिंबामध्ये पोटॅशियम आढळते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस पिल्याने तुमचा बीपी नियंत्रणात राहू शकतो.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com