Raksha Bandhan
Raksha Bandhanteam lokshahi

Raksha Bandhan 2022 : राखी बांधण्याची ही सर्वोत्तम वेळ, 4 शुभ योग

राखी बांधण्यासाठीचा मुहूर्त जाणून घ्या
Published by :
Team Lokshahi

Raksha Bandhan Confirm Date 2022 : 2022 मध्ये, रक्षाबंधनाचा सण 11 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमा तिथीला रक्षाबंधन उत्साहाने साजरे केले जाते. रक्षाबंधन 2022 च्या सणात शुभ मुहूर्ताची विशेष काळजी घेतली जाते. असे मानले जाते की या दिवशी शुभ मुहूर्तावर राखी बांधल्याने शुभ फळ मिळते. शुभ मुहूर्तावर केलेले कार्य शुभ फल देते, अशी यामागची धारणा आहे. ज्योतिष शास्त्रानुसार यावेळी रक्षाबंधनाला 4 शुभ योग तयार होत आहेत. त्यामुळे यावेळी रक्षाबंधनाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. रक्षाबंधनाची तारीख आणि राखी बांधण्यासाठीचा सर्वोत्तम मुहूर्त जाणून घेऊया. (Raksha Bandhan Confirm Date 2022)

Raksha Bandhan
CAPF Recruitment 2022 : CRPF, CISF, BSF आणि इतर विभागांमध्ये 84000 जागांची सुवर्णसंधी

रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमा रोजी साजरा केला जातो. पंचांगानुसार यावेळी पौर्णिमा 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10.38 पासून सुरू होत आहे. त्याच वेळी, पौर्णिमा 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7.05 वाजता समाप्त होईल. अशात, उदय तिथीनुसार, 11 ऑगस्ट 2022 रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाईल. या दिवशी राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त सकाळी 9.28 ते 10.14 पर्यंत आहे.

Raksha Bandhan
Shravan 2022 : श्रावणमध्ये या 5 राशींवर असेल भगवान शिवाची कृपा, कोणाचे नशीब बदलेल

रक्षाबंधन 2022 शुभ योग | रक्षा बंधन २०२२ शुभ योग

या वर्षी रक्षाबंधन या सणाला 4 शुभ योग बनत आहेत. आयुष्मान योग 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.35 ते 11 ऑगस्ट रोजी दुपारी 3.31 वाजेपर्यंत राहील. 11 ऑगस्ट रोजी पहाटे 5.30 ते 6.53 पर्यंत रवि योगाचा शुभ योग आहे. तर सौभाग्य योग 11 ऑगस्ट रोजी दुपारी 3.32 ते 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11.33 पर्यंत राहील. याशिवाय शोभन योगासोबतच धनिष्ठा नक्षत्राचाही शुभ संयोग आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com