लाईफ स्टाइल
चाकूची धार कमी झाली? घरच्या घरी करा हा उपाय
भाज्या, फळं आणि इतर अनेक गोष्टी कापण्यासाठी, चिरण्यासाठी स्वयंपाकघरात आपल्याला चाकूचा वापर करावा लागतो.
भाज्या, फळं आणि इतर अनेक गोष्टी कापण्यासाठी, चिरण्यासाठी स्वयंपाकघरात आपल्याला चाकूचा वापर करावा लागतो. चाकूमुळे भाजी, फळे पटापट कापली जातात. मात्र कधी कधी चाकूची धार गेल्यामुळे जेवण करताना अडचण निर्माण होते. तर तुम्हाला आम्ही आज चाकूला घरच्याघरी धार कशी करायची हे सांगणार आहोत.
कॉफी मगचा वापर करुन तुम्ही चाकूला धार काढू शकता. . धार काढण्याच्या दगडावर तुम्ही चाकू धार काढण्यासाठी जसा घासता, तसाच तुम्हाला तो उलट्या कॉफी मगवर घासायचा आहे.
देवघरातील सहानीचा उपयोग चंदनाचं खोड उगाळण्यासाठी केला जातो. ही सहान आपल्याला चाकुला धार काढण्यासाठी उपयोगात येतो.
फरशीचा वापर करुन देखिल तुम्ही चाकूला धार करु शकता. वर्तमान पत्र एखाद्या पायरीवर किंवा ओट्यावर ठेवा. यानंतर त्यावर चाकू ठेवा. आणि त्यावर घासा. त्यामुळे देखिल चाकूला तुम्ही धार करु शकता.