रिमूव्हरशिवाय अशी काढा नेलपॉलिश; जाणून घ्या ट्रीक्स
तुम्हाला एखाद्या खास कार्यक्रमाला जायचे असते. जो ड्रेस तुम्ही घातला आहे. त्यावर मॅचिंग नेलपेंट लावायची असते. अगोदरची नेलपॉलिश रिमूव्हर नाही आहे. तर जाणून घ्या अजून कशाप्रकारे तुम्ही नेलपॉलिश रिमूव्ह करु शकता.
तुम्ही व्हिनेगरच्या मदतीने नेलपॉलिशही काढू शकता. हे कापसाच्या मदतीने नखांवर देखील लावा. जर तुम्हाला चांगले परिणाम हवे असतील तर एका भांड्यात व्हिनेगर घ्या आणि त्यात काही थेंब लिंबाचा रस मिसळा. या द्रावणाने नेलपॉलिश स्वच्छ करा.
टूथपेस्ट हा खूप प्रभावी उपाय आहे. थोडीशी टूथपेस्ट घेऊन ती नखांवर लावा. आता कापसाच्या साहाय्याने हळू हळू चोळा. नखे काही वेळात स्वच्छ होतील.
जर तुमच्याकडे नेलपॉलिश रिमूव्हर नसेल, तर जुन्या नेलपॉलिशवर इतर काही नेलपॉलिश लावा आणि लगेच पुसून टाका. असे केल्याने जुनी पॉलिश निघून जाईल.
एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्यात 10 मिनिटे नखे बुडवून ठेवा. त्यानंतर कापूस चोळा. जुनी नेलपॉलिश निघून जाईल.