केस कापल्यानंतर वेगाने वाढतात? जाणून घ्या सत्य

केस कापल्यानंतर वेगाने वाढतात? जाणून घ्या सत्य

जेव्हा केसांशी संबंधित समस्या उद्भवतात. तेव्हा अनेकदा केस ट्रिम करण्याचा सल्ला जातो. पण, ट्रिम केल्याने केस वाढण्यास मदत होते का?
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Hair Trimming : सुंदर, चमकदार आणि मजबूत केस ही सर्व मुलींची इच्छा असते. बहुतेक मुलींना त्यांचे केस स्टाईल करणे आवडते. तथापि, जेव्हा केसांशी संबंधित समस्या उद्भवतात. तेव्हा अनेकदा केस ट्रिम करण्याचा सल्ला जातो. पण, ट्रिम केल्याने केस वाढण्यास मदत होते का? केस कापल्याने तुमचे केस खरोखरच वेगाने वाढतात का? जाणून घ्या.

केस कापल्यानंतर वेगाने वाढतात? जाणून घ्या सत्य
मेकअप करताना केलेल्या 'या' 5 चुका बिघडू शकतात तुमचे सौंदर्य, घ्या विशेष काळजी

लोकांचा नेहमीच असा विश्वास आहे की जर ते काही दिवसांनी केस कापत राहिले तर केस लांब होतील. पण, हे एक केवळ मिथक आहे. थांबलेल्या वाढीला वेग येईल या विचाराने तुम्ही केस कापत असाल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. केसांची टोके कापणे आणि त्यांची वाढ याचा काहीही संबंध नाही. ज्याचा तुमच्या टाळूशी काहीही संबंध नाही, ते केस वाढण्यास कशी मदत करतील?

जर ट्रिमिंग नसेल तर केस कसे वाढतील?

केस वाढवण्यासाठी चांगला आहार आणि डोक्याला तेलाने मालिश करणे आवश्यक आहे. जेव्हा आपण आपल्या केसांना व्यवस्थित आणि नियमितपणे मसाज करतो. तेव्हा आपण केसांच्या वाढीसाठी काहीतरी करत असतो. केसांच्या मसाज दरम्यान, तेल छिद्रांपर्यंत पोहोचते, यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. मसाज करताना, रक्ताभिसरण देखील वाढते, यामुळे योग्य पोषक आणि ऑक्सिजन केसांच्या कूपांमध्ये पोहोचतात. त्यामुळे केसांची वाढ जलद होते. केस निरोगी ठेवण्यासाठी कोणते तेल वापरावे असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर उत्तर आहे खोबरेल तेल, एरंडेल तेल की बदामाचे तेल, जास्वंदाचे तेल. दर आठवड्याला त्यांना मसाज केल्याने तुमच्या खराब झालेल्या केसांची समस्या दूर होईल.

कोरडे, निर्जीव आणि कमकुवत दिसणारे लांब केस असण्यात काही अर्थ नाही. केसांच्या लांबीबरोबरच ते जाड आणि मजबूत असणे देखील खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही संतुलित आहार घ्यावा, ज्यामध्ये भरपूर प्रथिने, ओमेगा-३ आणि झिंक असतात. जर तुम्ही योग्य आहार घेतला नाही तर तुमचे निरोगी लांब केस निरोगी राहणार नाहीत, त्यामुळे तुमच्या आहारात भरपूर हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश करा. याशिवाय पिण्याचे पाणी आवश्यक प्रमाणात ठेवा.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com