हळद देखील अ‍ॅलर्जीवर करु शकते उपचार; जाणून घ्या कसे

हळद देखील अ‍ॅलर्जीवर करु शकते उपचार; जाणून घ्या कसे

हळदीचा वापर विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. याशिवाय आयुर्वेदात हळदीला गुणधर्मांचा खजिना म्हणूनही संबोधले जाते. तसेच हळदीचा वापर अनेक दशकांपासून घरगुती उपाय म्हणून केला जात आहे. याशिवाय त्वचेची चमक वाढवण्यासाठी हळदीचा सर्वांगीण वापर केला जाऊ शकतो.
Published by :
Siddhi Naringrekar

हळदीचा वापर विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. याशिवाय आयुर्वेदात हळदीला गुणधर्मांचा खजिना म्हणूनही संबोधले जाते. तसेच हळदीचा वापर अनेक दशकांपासून घरगुती उपाय म्हणून केला जात आहे. याशिवाय त्वचेची चमक वाढवण्यासाठी हळदीचा सर्वांगीण वापर केला जाऊ शकतो. जर अॅलर्जी असली तरी ती कमी करण्यासाठी हळद देखील उपयुक्त ठरू शकते. एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच्या अतिरीक्त प्रतिक्रियामुळे अॅलर्जी वाढू शकते. ज्यावर हळदीचा उपचार करता येतो.

हवामानात बदल होत असल्याने अनेकांना अॅलर्जीची समस्या वाढते. शरीराच्या पांढऱ्या रक्त पेशींना अॅलर्जीन इम्युनोग्लोबुलिन ईचा प्रतिकार करावा लागतो. त्यामुळे अॅलर्जी वाढू लागते. अॅलर्जी दूर करण्यासाठी हळद हा एक चांगला पर्याय असू शकतो. हळद ही एक प्रकारची औषधी वनस्पती आहे ज्यामध्ये अँटी-बायोटिक गुणधर्म असतात. त्याचा आहारात समावेश केल्यास अॅलर्जी टाळता येते.

कोणत्याही प्रकारची अॅलर्जी कमी करण्यासाठी हळदीचे दूध दररोज नियमितपणे सेवन केले जाऊ शकते. हळद आणि मधाचा चहा पिऊन ऍलर्जीवर उपचार करता येतात. दिवसातून एकदा तरी हळदीचे पाणी प्यायल्याने अॅलर्जीची लक्षणे कमी होण्यास मदत होते.

हळद देखील अ‍ॅलर्जीवर करु शकते उपचार; जाणून घ्या कसे
जलद वजन कमी करायचे असेल तर 'या' भाज्यांचा आहारात समावेश करा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com