Jewellery : लग्नामध्ये लेहंगा, साडी किंवा ड्रेसवर कोणते दागिने घालावेत? जाणून घ्या
सध्या लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे महिलांना तयार होण्यासाठी विशेष उत्सुक असतात. लग्नाच्या वेळी वेस्टर्न तसेच पारंपरिक पोशाख परिधान केला जातो. वेस्टर्न ड्रेस असो किंवा पारंपरिक ड्रेस कोणत्याही कपड्यांवर योग्य ते दागिने असावेत. विशेषतः भारतीय पारंपरिक पोशाख असेल तर हा प्रश्न नेहमीच पडतो. लहंगा, साडी, तसेच इतर इतर पारंपरिक ड्रेसवर कोणते दागिने घालावेत याबद्दल आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया.
लेहंगा :
सध्या लग्नाचा काळ सुरु आहे. लेहंग्याला विशेष पसंती दिली जाते. मात्र लेहंग्यावर कोणते दागिने घालावेत हा प्रश्न उपस्थित राहतो. तर तुम्ही लेहंगा परिधान करणार असाल तर स्टोन किंवा क्रिस्टल वर्क असलेले दागिने अधिक आकर्षक दिसतील. या प्रकरच्या दागिन्यांमध्ये तुम्ही लेहंग्याला मॅचिंग असे रंग निवडू शकता. त्याच प्रमाणे सध्या बोहो स्टाइल अधिक पसंत केली जाते. लेहंगा किंवा ड्रेसवर तुम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरीदेखील परिधान करु शकता. तुम्ही मिरर वर्क असलेला लेहंगा घालणार असाल तर कुंदन किंवा मीनाकारी असे मोठे कानातले घालू शकता.
साडी :
तुम्ही साडी नेसणार असाल तर त्यावर सुंदर असे दागिने परिधान करु शकता. बनारसी साडीसोबत तुम्ही कुंदन वर्क असलेले झुमके परिधान करु शकता. त्याचप्रमाणे सध्या टेंपल ज्वेलरीला अधिक पसंती मिळते, बनारसी, कांजीवरम, पाटन पाटोलासारख्या साड्यांवर टेंपल ज्वेलरीने तुमचं सौन्दर्य अधिक खुलून दिसेल. यामुळे तुम्हाला एक राजेशाही लुकदेखील मिळेल.
ड्रेस :
तुम्ही जर ड्रेस परिधान करणार असाल तर मेटल अॅंटीक डिझाईन असलेले मोठे पोल्की झुमके घालू शकता. तसेच क्रिस्टल स्टोन वर्क असलेले ब्रेसलेट , तसेच मॅचिंग बांगड्या अधिक सुंदर दिसतील.
प्रिंटेड वर्क असणारे कपडे :
प्रिंटेड रफल साडीची सध्या स्टाइल आहे. यावर तुम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरी घालू शकता. या लुकमध्ये तुम्ही खुप क्लासी दिसाल.