eye flapping
eye flappingTeam Lokshahi

डोळ्यांचे फडफडणे शुभ-अशुभ नेमकं शास्त्र काय?

डोळे फडफडणे हे नेमकं शुभ आहे की अशुभ. मात्र काही लोकं याला अशुभ मानतात तर काही लोक याला शुभ मानतात.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

डोळे फडफडणे(eye flapping)हे नेमकं शुभ आहे की अशुभ. मात्र काही लोकं याला अशुभ मानतात तर काही लोक याला शुभ मानतात. लोकांचा असा समज आहे की जर एखाद्या शुभ कार्याच्या आधी डोळे फडफडले तर ते चांगले नसते. यामागचे नेमकं कारण काय आहे तर?

डोळ्यांच्या मांसपेशी जेव्हा आखडून जाातात तेव्हा डोळे फडफडू लागतात. ही फडफड दोन्ही पापण्यांमध्ये होऊ शकते. याला मेडिकल टर्ममद्ये ब्लेफेरोस्पाज्म म्हणतात.

हे डोळ्याचे फडफडणे गंभीर?

डोळ्यांचे फडफडणे सामान्यपणे काही सेकंदापासून मिनिटांपर्यंत राहते. इतकंच नव्हे तर हा त्रास काही लोकांना काही दिवसांसाठी होऊ शकतो. डोळ्यांचे फडफडणे हा काही त्रासदायक नसतो. मात्र हे गंभीर आजारांचे संकेत असू शकतात.

स्त्री आणि पुरुष यांचा उजवा आणि डावा डोळा फडफडणे यामागेही वेगवेगळे अर्थ असतात. सामुद्रिक शास्त्रांमध्ये याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. वास्तुशास्त्रानुसार किंवा ज्योतिषशास्त्रानुसार डोळ्याची फडफड हे शुभ आणि अशुभ घटनेचे पूर्वसंकेत देतात. भविष्यात होणाऱ्या एखाद्या घटनेची पूर्वसूचना आपल्याला याद्वारे मिळते, असे म्हटले जाते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com