झाडू ठेवण्याची योग्य पद्धत कोणती? चला आपण पाहू

झाडू ठेवण्याची योग्य पद्धत कोणती? चला आपण पाहू

आपल्या काही शास्त्र मध्ये घरातील काही वस्तू कशा पद्धतीने ठेवाव्यात या बदल माहिती दिली आहे. त्याचे योग्य पालन आपण केले तर त्याचा आपल्याला फायदा नक्की होतो.
Published by  :
Team Lokshahi

आपल्या काही शास्त्र मध्ये घरातील काही वस्तू कशा पद्धतीने ठेवाव्यात या बदल माहिती दिली आहे. त्याचे योग्य पालन आपण केले तर त्याचा आपल्याला फायदा नक्की होतो. घरातील झाडू ठेवण्याची पद्धत बऱ्याच जणांना माहीत नसते. तर घरात झाडू कसा ठेवावा, त्यामुळे आपल्याला कश्या प्रकारे त्याचा लाभ आपल्या मिळेल, या बदल आपण माहिती जाणून घेऊ.

वास्तू शास्त्रा मध्ये काही नियम सांगितले गेले आहेत. झाडू ठेवण्याची पद्धत काय आहे या बद्दल माहिती पाहू. झाडू हा माता लक्ष्मीचे प्रतीक आपण मानतो. तसेच आपल्या घरातील स्वच्छता करण्याचे सुद्धा काम झाडू करतो आणि ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे वास्तव्य जास्त काळ असते.

झाडूला वास्तू शास्त्रा मध्ये खुप महत्वाचे मानले गेले आहे. कारण झाडू घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतो आणि आपल्या घरातील सकारात्मक गोष्टींचा ऊर्जा वाढवण्यास मदत असतो. बरेच जण झाडू कधीपण खरेदी करता. शक्यतो एका शुभ दिवशी हा झाडू घरी आणावा तसेच त्याची पूजा करून त्याचा वापर केला तर त्याचे लाभ खुप छान मिळतात. बऱ्याच जणांना माहीत असेल आपल्या जुन्या पिढतील लोक झाडू नवीन आणल्यावर हळदी कुंकू लावून पूजा करत असत आणि नंतर त्याचा वापर करत असत.

झाडू ठेवण्याची पद्धत

झाडू कसा तेव्हा व कोठे ठेवावा. झाडू हा कधीही बाहेरील व्यक्तीच्या नजरेस पडेल अशा ठिकाणी ठेऊनये. तसेच झाडू आपण कचरा ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी ठेऊन नका त्याचबरोबर ज्या ठिकणी आपण चप्पल व बूट ठेवतो त्या ठिकाणी सुद्धा झाडू ठेऊ नये. आपण झाडूला लक्ष्मी समान मानतो, त्यामुळे अस्वच्छ ठिकाणी झाडू ठेवू नका. झाडू उलट कधीही ठेऊ नका हि खुप चुकीची गोष्ट आहे.

बरेच लोक हे सूर्य मवाळण्याच्या वेळेस झाडून काढतात तर असे कधीही करू नका. त्याच सोबत जर का कोणी घरातील व्यक्ती खुप महत्वाच्या कामा साठी बाहेर गेला असेल तर लगेच घर झाडून काढू नका यामुळे त्या कामात अपयश येण्याची शक्यता असे. काही वेळेस चुकून आपण झाडू अशा ठेवतो त्या ठिकाणी आपला किंवा इतरांचा पाय त्यावर पडत असतो किंवा लागतो. तर अशा ठिकाणी झाडू ठेऊ नका.

झाडू ठेवण्याची योग्य जागा आहे दरवाज्याच्या मागे या ठिकाणी तुम्ही झाडू ठेवला तर कोणची नजर पडणार नाही. झाडू कधीही उभा किंवा उलट ठेऊ नका तो जमिनीवर आडवा ठेवा. सर्व योग्य दिवस आहे झाडू ठेवण्याची ती आहे दक्षिण आणि पश्चिम या मधील कोपरा हि दिशा झाडू ठेवण्यासठी खुप चागली आहे. एक लक्षात असुद्या झाडू कधीपण स्वच्छ जागेवरच ठेवा.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com